Engineering Education in Marathi: अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीमधून दिल्यास..; अजितदादांनी विधीमंडळात..

Engineering Education in Marathi Ajit Pawar : देशातील १९ महाविद्यालयांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे.
  Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Engineering Education in Marathi Ajit Pawar : उच्च शिक्षण हे मातृभाषेत देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तसा आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत येत्या जूनपासून राज्यात अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध होणार असल्याचे म्हटलं आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळात काल (गुरुवार) भाष्य केलं आहे. याबाबत त्यांनी टि्वट करीत या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  Ajit Pawar
Who is Dhangekar? असे विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना दाखवून दिलं.. Dhangekar is now...."

आपल्याकडील, विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना इंजिनिअरिंग केल्यानंतर जितके अस्खलित इंग्लिश यायला हवे तितके येत नाही. आपली मातृभाषा मराठी आलीच पाहिजे, परंतु इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम मराठीत केल्यास त्या मुलांना पुढे कोणीही रोजगार देणार नाही.

यामुळे नव्या पिढीचे नुकसान होईल. यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. रोजगारानिमित्त जगाच्या पाठीवर कुठेही जाताना फ्रेंच, जर्मन अशा अन्य भाषा येणे गरजेचे ठरते.’ असे अजित पवार म्हणाले.

  Ajit Pawar
MNS : धक्कादायक : मनसेच्या मोठ्या नेत्यावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोरांनी चेहऱ्यावर..

"इंग्रजी विषयाची भीती दूर करून देशातील प्रत्येक राज्यातील मातृभाषेतून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने सुरू केलेल्या मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षणाला देशात मराठी भाषेतून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. सर्वात जास्त प्रवेश हे मराठीतून झाले असल्याची माहिती परिषदेने जाहीर केली आहे.

इंग्रजी भाषेची भीती दूर करण्यासाठी मागील वर्षी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने यासाठी धोरण आणले होते. त्या धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१पासून आठ भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलगु, तामिळ, गुजराती, कानडी आणि मल्याळम या भाषांचा समावेश होता. यासाठी देशातील १९ महाविद्यालयांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com