नीलम गोर्‍हे अडचणीत; अविश्वास प्रस्ताव दाखल

विधान परिषदेत (Legislative Council) अकोला मनपा बरखास्त करावी, या संदर्भात लक्षवेधी मांडण्यात आली होती.
Nilam Gorhe 

Nilam Gorhe 

sarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या (Legislative Council) उपसभापती नीलम गोर्‍हे (Nilam Gorhe) यांच्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. गोर्‍हे यांनी पक्षपातीपणा केला असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

विधान परिषदेत अकोला मनपा बरखास्त करावी, या संदर्भात लक्षवेधी मांडण्यात आली होती. हे प्रकरण न्यायालयात असल्याने यावर चर्चा होऊ नये, अशी मागणी करण्यात आली. याबाबतची लक्षवेधी राखून ठेवण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली. तरीही लक्षवेधीवर चर्चा झाली. या चर्चेत केवळ शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनाच बोलून दिले, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

<div class="paragraphs"><p>Nilam Gorhe&nbsp;</p></div>
मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का, असे म्हणणाऱ्या अजितदादांचा शब्द फोल ठरला...

विधान परिषद विरोधी पक्षनेते असताना मलादेखील नीलम गोर्‍हे यांनी या विषयावर बोलू दिले नाही, असे दरेकर म्हणाले. त्यामुळे उपसभाती यांच्या विरोधात अविश्वास दाखल केला, असल्याचे दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सभागृहाचा विश्वास गोर्‍हे यांनी गमावला आहे. म्हणून अविश्वास ठराव दाखल, असल्याचे दरेकर म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Nilam Gorhe&nbsp;</p></div>
निलंबनाबाबत अजितदादा ओघात बोलून गेले अन् फडणवीसांनी संधी साधली...

या वेळी दरेकर म्हणाले, न्यासा संदर्भात आम्ही घोटाळा उघड केला. राज्य सरकारने सांगण्याची गरज आहे. नेमके पेपर फुटी प्रकरणमध्ये काय झाले. परत परीक्षा होणार का, पुढे विद्यार्थीचे भवितव्य काय, असा प्रश्न दरेकर यांनी केला. सरकारने स्पष्टता द्यायला हवी. न्यासाचा घोटाळा आम्ही उघड केला होता. आता इतर विभागाच्या विद्यार्थ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. आता 24 तारखेला झालेल्या परिक्षेबाबात सरकार काय निर्णय घेणार हे त्यांनी तत्काळ स्पष्ट करावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com