महाराष्ट्रात मास्कमुक्तीचा निर्णय चुकलाय का? 'एनआयव्ही'च्या संचालकांचं मोठं वक्तव्य

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने मास्क वापरण्यास कोणतीही सक्ती नसल्याचे जाहीर केले आहे.
No compulsion of Mask in Maharashtra
No compulsion of Mask in MaharashtraSarkarnama

मुंबई : कोरोनाची (Covid 19) रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने मास्क (Mask) वापरण्यास कोणतीही सक्ती नसल्याचे जाहीर केले आहे. गुढीपाडव्यापासून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार नाही. मास्कमुक्ती केली असली तरी सरकारने मास्कचा वापर करण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे. महाराष्ट्र (Maharashtra) सरकारच्या मास्कमुक्तीच्या या निर्णयाबाबत आता काही जणांकडून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

कोरोना काळात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडलेल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेनेच (NIV) याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संस्थेच्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम (Dr. Priya Abraham) यांनी मास्कच्या वापराबाबत नागरिकांना सतर्क केलं आहे. 'एएनआय'शी बोलताना अब्राहम म्हणाल्या, सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असून हे चांगली बाब आहे. पण कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी आपण मास्क वापरायला हवा. संसर्ग रोखण्यासाठी मास्क महत्वाचा आहे.

No compulsion of Mask in Maharashtra
पंतप्रधान मोदींच्या हत्येचं षडयंत्र; 20 किलो आरडीएक्स अन् 20 हल्ल्यांच्या दाव्यानं खळबळ

आपण अजूनही काळजी घेणं आणि दक्ष राहणं आवश्यक आहे. अजून या गोष्टी टाळण्याची वेळ आलेली नाही, असं स्पष्ट करत अब्राहम यांनी मास्कमुक्तीच्या निर्णयावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाचे बहुतेक निर्बंध उठवले असले तरी मास्कमुक्ती केलेली नाही. महाराष्ट्र सरकारने गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कची सक्ती उठवली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत माहिती दिली. 'आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त मिरवणूका जोरात काढा,' असे आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्याच बरोबर आता नागरिकांना मास्क पासूनही मुक्ती मिळाली आहे. मास्क ज्यांना वापरायचा असले त्यांनी वापरावा, त्याची सक्ती केली जाणार नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

राज्यातील बहुतांशी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याचअंशी कमी झाले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निर्बंध सुरू होते. निर्बंध हटवण्यात आल्यामुळे राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढता येणार आहे. तसेच रमजानचा सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही उत्साहाने साजरी करता येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com