केंद्रीय पातळीवर नवीन समिकरणांची नांदी; नितीशकुमारांनी घेतली केजरीवालांची भेट

विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) सध्या प्रयत्न करत आहेत
Nitish Kumar, Arvind Kejriwal
Nitish Kumar, Arvind Kejriwalsarkarnama

Nitish Kumar : नवी दिल्ली : नितीशकुमार यांनी भाजपशी (BJP) फाडकत घेतल्यानंतर आता ते केंद्रीय पातळीवर सक्रीय झाले आहेत. नितीशकुमार (Nitish Kumar) दिल्लीत जाऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेट घेत आहेत. या संदर्भात नितीशकुमार यांनी आज डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची भेट घेतली.

नितीशकुमार यांनी आता दिल्लीच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी अरविंद केजरीवाल आणि सीताराम येचुरी यांची भेट घेतली. सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यावर नितीश कुमार म्हणाले, आमचे फार पूर्वीपासूनचे संबंध आहेत, जेव्हा आम्ही दिल्लीत यायचो, तेव्हा भेट व्हायची. देशभरातील सर्व डावे पक्ष एकत्र आले तर मोठी गोष्ट होईल. राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या सीताराम येचुरी यांना सोबत घ्यावे लागेल.

Nitish Kumar, Arvind Kejriwal
राष्ट्रवादीच्या विसर्जनाची सुरुवात बारामतीपासून करा : बावनकुळेंनी ललकारले

सीताराम येचुरी म्हणाले की, सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे देशासाठी महत्त्वाचे आहे, नितीश येणे ही स्वागतार्ह बाब आहे. ते आधीही यायचे, सर्व विरोधी पक्ष एकत्र आले पाहिजेत, हाच उद्देश आहे. संविधानाचे चारित्र्य जपायचे आहे. सर्वप्रथम एकत्र येण्याचा अजेंडा आहे, पंतप्रधान नंतर ठरतील. सध्या बहुतांश चर्चा सुरू असून, सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Nitish Kumar, Arvind Kejriwal
भाजपवाल्यांना पवार कुटुंबियांचे कामच उत्तर देईल! राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

भाजपवर निशाणा साधत नितीशकुमार म्हणाले की, आजकाल ज्या पद्धतीने सरकार चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते चुकीचे आहे. देशात कोणते विकास प्रकल्प होत आहेत. सर्व काही एकतर्फी होत असून हळूहळू प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ​​आता भाजपसोबत जाण्याचा मूर्खपणा आयुष्यात कधीही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in