मोठी बातमी : नीतीशकुमार घेणार शरद पवारांची भेट; विरोधकांची रणनीती ठरणार

पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी ८ सप्टेंबर रोजी नीतीश कुमार यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Sharad Pawar-Nitish Kumar
Sharad Pawar-Nitish Kumar Sarkarnama

मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) हे ८ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांची रणनीती काय असावी, यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Nitish Kumar will meet Sharad Pawar in Delhi on September 8)

विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्यावेळी नीतीश कुमार हे पवारांची भेट घेणार आहेत. नीतीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडले आहेत. त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेत लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती करत बिहारमध्ये सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात लढण्यासाठी या बैठकीत काय रणनीती ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Sharad Pawar-Nitish Kumar
...तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार : अशोक चव्हाणांबाबत दानवेंचे वक्तव्य

पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी ८ सप्टेंबर रोजी नीतीश कुमार यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शरद पवार यांची दिल्ली आणि मुंबईत येऊनही भेट घेतली होती. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हेही पवारांना मुंबईत भेटले होते. त्यानंतर नीतीश कुमार हे पवारांना भेटत आहेत.

Sharad Pawar-Nitish Kumar
‘ते’ चित्र हटवून पक्षनिष्ठा देखावा लावा; सेनेतील बंडखोरीवर भाष्य करणारा देखावा लावण्यास कोर्टाची परवानगी

दरम्यान, नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. भाजपसोबतची सत्ता सोडून नीतीशकुमार यांनी कट्टर विरोधक लालू यादव यांच्या पक्षाशी संधान साधले आहे. त्यानंतर नीतीशकुमार यांनी चंद्रशेखर राव यांचीही भेट घेतली आहे. त्यानंतर आता नीतीश हे पवारांना भेटणार आहेत, त्यातून त्यांनी विरोधी आघाडीत मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in