Nitin Gadkari News : 'कोव्हीड आणि युद्धातही जेवढे मृत्यू होत नाहीत, तेवढे रस्ते अपघातात..' ; गडकरी म्हणाले..

Panvel News : जिल्हा स्तरावर समिती स्थापन करणार...
Nitin Gadkari News :
Nitin Gadkari News :Sarkarnama

Raigad District News : भारतात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण फार मोठे आहे. भारतात प्रतिवर्षी सुमारे पाच लाख अपघांतांमध्ये दीड लाख नागरिक मृत्यू पावतात. कोव्हीड असो, साथीचे रोग असो वा युद्धातही इतक्या संख्येत लोकांचा मृत्यू होत नाहीत, जितके अपघातात मृत्यू होतात, याबद्दल दुखं वाटतं. महामार्गावरील असे ब्लँक स्पॉट शोधून यावर उपाययोजना केले जावेत. यासाठी जिल्हास्तरावर याविषयी समिती स्थापन करण्यात आल्याचे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील पळस्पे येथे पळस्पे (जिल्हा रायगड) येथे ४१४ कोटी रुपये किंमतीच्या व ६३ किलोमीटर लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री उदय सामंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केले.त्या प्रसंगी ते बोलत होते.

Nitin Gadkari News :
APMC Election : ...तर कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आलेला सदस्यही अपात्र ठरणार

रायगड जिल्ह्यातील जेएनपीटी व दिघी या दोन समुद्री बंदरांचे आपल्या देशाच्या प्रगती महत्त्वाचे योगदान आहे. या प्रकल्पात स्थानिक तसेच राष्ट्रीय विकासात भरीव योगदान देत आहेत.

समुद्रीमार्ग व्यापार, पर्यटन व औद्योगिक विकास म्हणजेच देशाची प्रगती आणि हा विकास सहज साध्य होऊ शकतो, ते मजबूत रस्त्यांच्या जोडणीकरूनच.पनवेल ते कासू या महत्वाच्या महामार्गावरील काँक्रिटीकरणामुळे नागरिकाचे प्रवास गतीने होण्यास मदत होईस. तसेच वेळ आणि इंधन याची बचत होणार आहे. वाहन चालवण्याचा खर्च, तसेच देखभाल खर्चात घट होईल. जेएनपीटी व दिघी या दोन बंदरांना जोडणारा हा मार्ग एक दुवा असल्यामुळे जल वाहतूकीच्या विकासाला चालना मिळणार आहे.

मुंबई- गोवा नॅशनल महामार्ग ६६ हा कोकण प्रांतातील मुख्य पर्यटन ठिकाणांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकास वाढीस लागणार आहे. मुख्य औद्योगिक घटकांना जोडणारा हा मार्ग आहे, त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या विकासालाही हातभार लागणार आहे. कृषी, फलोत्पादनासाठी वाहतूक सोपे होऊन, या व्यापरांना चालना मिळेल. नव्या सुधारित रस्ता सुरक्षा प्रणाली यामुळे अपघातांच्या संख्येत घट होईल. हे प्रकल्प केवळ जिल्हा, राज्याच नाही तर संपूर्ण देशाच्या व्यापार वाढीस व सर्वसमावेशक प्रगतीमध्ये महत्त्वाचा भाग बनतील .

आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री गडकरींनी तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या नवे आणखी तीन प्रकल्प घोषित केले आहे. कळंबोली जंक्शन हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा १३,००० कोटी रुपयांचा राजधानी दिल्लीला जोडणारा महामार्ग या कामांचा समावेश आहे. या ही प्रकल्पांना लवकरच सुरूवात केले जाईल, अशी ग्वाही मंत्री गडकरींनी दिली.

Nitin Gadkari News :
Sangali Politics : तासगाव बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपसमोर तिसरी आघाडी उभी होणार?

मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंम्बरच्या आत पूर्ण करण्यात येणार, आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न.

- रस्त्यावर 6- 8 इंच टॉपिंग करण्याच्या सूचना, चारपदरी मार्ग तयार करण्यात येणार.

- अपघात निवारण समिती स्थापन करणार

- दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन ब्लॅक स्पॉट, अपघातस्थळची पाहणी करावी.

- राज्यात सॅटेलाईट बेस टोल तयार करण्यात येणार.

- जेएनपीटी ते दिल्ली १२ तासांत पोहचता येणार

- कळंबोली येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यात येणार.

- एकूण सुमारे १५ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार.

- नवी मुंबई एअरपोर्ट येथे पोहचण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रयत्न.

- कोकणातील पर्यटन वाढीसाठी ऍमफीबीअस (amphibias) सी - प्लेनचे नियोजन करण्याचा विचार.

- कोकणाचा आर्थिक, औद्योगिक विकास करण्याची गरज.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com