..तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले ; राणेंनी ठाकरेंना डिवचलं

शिव संवाद यात्रेची सुरुवात ही उद्यापासून ( 21 जुलै) होणार आहे. भिवंडीतून या यात्रेचा नारळ फुटणार आहे.
nitesh rane twitter
nitesh rane twittersarkarnama

मुंबई : शिवसेनेचे आमदार,खासदार आणि नगरसेवक हे शिंदे (eknath shinde) गटाला पाठिंबा देत आहेत. काल (मंगळवारी) शिंदे गटातून वरूण सरदेसाई यांची युवासेना अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेची (shivsena) गळती रोखण्यासाठी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरूवात होत आहे. (nitesh rane news update)

आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेवर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी टि्वट केलं आहे. राणेंनी एक फोटो टि्वटमध्ये शेअर केला आहे. "रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले. तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले," असं टि्वट नितेश राणेंनी करुन आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्यानंतर बोलताना बंडखोर आमदारांवर टीका केली. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, असं आदित्य ठाकरे म्हणाले. नितेश राणेंच्या या टि्वटला आदित्य ठाकरे काय उत्तर देतात, हे लवकरच समजेल.

nitesh rane twitter
बाळासाहेबांना आम्हीच शिवसेनेत आणल्याचा दावाही शिंदे गट करतील ; राऊतांचा टोमणा

शिव संवाद यात्रेची सुरुवात ही उद्यापासून ( 21 जुलै) होणार आहे. भिवंडीतून या यात्रेचा नारळ फुटणार आहे. यानंतर भिवंडी-नाशिक-दिंडोरी-संभाजीनगर आणि शिर्डी या ठिकाणी ही शिव संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांचा बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न असणार आहे. आदित्य ठाकरे यांनी याआधी मुंबईत अशा प्रकारे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. त्यामुळे ठाकरे पितापुत्रांच्या या प्रयत्नांना यश येणार की अशाच प्रकारे गळती सुरुच राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com