ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर राणेंचे टीकास्त्र ; म्हणाले, तर ही वेळ आली नसती..

आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचाही प्लॅन आखला आहे.
nitesh rane, aditya thackeray
nitesh rane, aditya thackeraysarkarnama

मुंबई : शिवसेनेतली पडझड रोखण्यासाठी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) हे आजपासूनच निष्ठा यात्रेवर आहेत.आदित्य ठाकरे मुंबईतील ठाकरे गटाकडे उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (aditya thackeray latest news)

या यात्रेची सुरुवात ही बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून म्हणजेच मुंबईतील भायखळ्यातून होत आहे. आदित्य ठाकरे यांचीही निष्ठा यात्रा फक्त मुंबई पुरती थांबणार नाही, तर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचाही प्लॅन आखला आहे. मुंबईनंतर आदित्य ठाकरे राज्यातील प्रत्येक मतदारसंघाकडे आपले लक्ष वेधणार आहेत.

या निष्ठा यात्रेवर भाजपचे नेते,आमदार नितेश राणे (nitesh rane)यांनी निशाणा साधला आहे. DINO वर निष्ठा दाखवण्यापेक्षा शिवसैनिकांवर दाखवली असती तर निष्ठा यात्रा काढण्याची वेळ आली नसती, असे टि्वट नितेश राणेंनी केलं आहे.

nitesh rane, aditya thackeray
होय, मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री ; उद्धव ठाकरेंना रिक्षाचालकांनी सुनावलं

शिवसेनेच्या राज्यातील ५० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरे "निष्ठा यात्रे" दरम्यान दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटी, मेळावे ते घेणार आहेत. या मतदार संघांमधील शिवसेनेशी एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देऊन शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.आदित्य ठाकरे हे प्रत्येक मतदार संघ प्रत्येक शाखा पिंजून काढणार आहेत.

आदित्य ठाकरे यांना शिवसेनेची गळती रोखण्यात किती यश येईल याबाबत ही शंका आहे. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेनंतर शिवसेनेत किती आणि एकनाथ शिंदे गटात किती हे स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in