'आत्महत्या करेन,' असे म्हणणाऱ्या आव्हाडांना राणेंचा सल्ला ; 'कमी भ्रष्टाचार करा'

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
Jitendra Awhad, Nitesh Rane
Jitendra Awhad, Nitesh Ranesarkarnama

मुंबई : ''ईडीने चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल, मी काही चुका वगैरे केल्या नाहीत. पण काही सांगता येत नाही वरच्या टेपिंग-बिपिंगमध्ये चुका असतील तर काही करता येणार नाही,'' असे विधान राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानावर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी आव्हाडांना टोमणा लगावला.

नितेश राणे म्हणाले, ''राज्याचे मंत्री असे बोलतो, हे दुर्दैव्य आहे. ते वडील म्हणून बोलत असतील, तर मी म्हणतो कमी भ्रष्टाचार करा,'' राणे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने (ED)जोरदार झटका दिला. ईडीने पाटणकर यांचे ठाण्यातील कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट्स जप्त केले. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Jitendra Awhad, Nitesh Rane
नंदकिशोर चतुर्वेदींचा मनसुख हिरेन तर केला नाही ना ; राणेंचा ठाकरेंना सवाल

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतला असल्याचे त्यांच्या विधानावरुन दिसते. ते असे का बोलले याची चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या काही नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड हे देखील तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांना अशा कोणत्या कारवाईची चाहुल लागली आहे का? याच उद्विग्नतेमधून त्यांनी हे वक्तव्य केले का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Jitendra Awhad, Nitesh Rane
काश्मीरी पंडितांच्या दुःखाला भाजप राजकीय रंग देतयं ; मेहबूबा मुफ्ती संतापल्या

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ''राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे.” केंद्र सरकारकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सुडबूद्धीने कारवाई सरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सुडबूद्धीने कारवाई सरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारलाच आव्हान दिलं. "आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, पण आम्ही लढणार आणि तुमच्या बदल्याचं राजकारण समोर आणणार", असं राऊतांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com