नंदकिशोर चतुर्वेदींचा मनसुख हिरेन तर केला नाही ना ; राणेंचा ठाकरेंना सवाल

नंदकिशोर चतुर्वेदी बाबत मी गेल्यावर्षी पासून बोलत आहे. ते कुठे आहे हे समोर आले पाहिजे,
नंदकिशोर चतुर्वेदींचा मनसुख हिरेन तर केला नाही ना ; राणेंचा ठाकरेंना सवाल
sarkarnama

मुंबई : : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर मंगळवारी ईडीने (ED) कारवाई केली. या कारवाईत नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedy)हे नाव पुढे आलं आहे.

श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी देशातून पळ काढल्याची तपास यंत्रणांना माहिती मिळाली आहे. आयकर विभाग आणि ईडी चतुर्वेदीच्या मागावर आहेत. कारवाईच्या भीतीनं तो भारत सोडून आफ्रिकन देशात पसार झाल्याचं सांगितलं जातं आहे.

भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यावर आरोप केले आहे. ''नंदकुमार चतुर्वेदी यांचा मनसुख हिरेन तर केला नाही ना,'' असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे. नंदकिशोर चतुर्वेदी बाबत मी गेल्यावर्षी पासून बोलत आहे. ते कुठे आहे हे समोर आले पाहिजे, मी गेल्यावर्षी पासून ट्विट करीत आहे. या नंदकिशोर यांच्या माध्यमातून हवाला झाला आहे, ते कुणाचे पार्टनर आहे,''

नंदकिशोर चतुर्वेदींचा मनसुख हिरेन तर केला नाही ना ; राणेंचा ठाकरेंना सवाल
काश्मीरी पंडितांच्या दुःखाला भाजप राजकीय रंग देतयं ; मेहबूबा मुफ्ती संतापल्या

''तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जावायावर आरोप झाल्यानंतर 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचा राजीनामा घेतला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या मेव्हण्यावर कारवाई झाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला हवा,'' असे राणे म्हणाले. ''मनोहर जोशींना एक न्याय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक न्याय का, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला.

नंदकिशोर चतुर्वेदींचा मनसुख हिरेन तर केला नाही ना ; राणेंचा ठाकरेंना सवाल
हवाला किंग चतुर्वेदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे संबंध काय? सोमय्यांचा हल्लाबोल

''ईडीने काल जो व्यवहार समोर आणला आहे. त्यानुसार ३० कोटी रुपयांचं मनी लॉन्डरिंग झालं आहे. सगळी प्रकरणे बाहेर आली तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे. नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedi)आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय,'' असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

''2014 मध्ये एक शेल कंपनी स्थापन केली त्यात आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे संचालक आहेत. या कंपनीत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी कधी मनी लॅाडरिंग केले आहे का? आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी स्थापन केलेली कंपनी आज हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीची आहे, हा व्यवहार का झाला, कसा झाला,'' असा प्रश्न सोमय्यांनी केला आहे.

कोण आहे नंदकिशोर चतुर्वेदी

ठाण्यात नीलांबरी हा गृहनिर्माण प्रकल्प पुष्पक बुलियन या कंपनीने उभारला आहे. पुष्पक बुलियन कंपनीच्या विरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदकिशोर चतुर्वेदीनेच अनेक शेल कंपन्यांच्या मार्फत पैसे वळवल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे. या कंपनीची 22 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या कंपन्यातील काही फंड हे वेगवेगळ्या फर्ममध्ये वळवण्यात आला आहे. ईडीचे अधिकारी यातील डीलर नंदकिशोर चतुर्वेदीपर्यंत पोहोचली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com