'उद्धव ठाकरे तिथे उभे राहिले असते तर हवेने उडून गेले असते; असे....!'

भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका
Nitesh Rane, Uddhav Thackeray
Nitesh Rane, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी मुंबईत झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली होती. फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडताना तेथे होतो, या दाव्याची ठाकरे यांनी खिल्ली उडवली. बाबरी पाडली तेव्हा मी, होतो असे देवेंद्रजी म्हणाले. ती तुमच्या काय शाळेची सहल होती काय? तुमचे वय काय तुम्ही बोलता किती. तुम्ही खरच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असती, असे ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Nitesh Rane, Uddhav Thackeray
आता राणा बीकेसीच्या मैदानावर हनुमान चालिसा म्हणणार : उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान

नितेश राणे म्हणाले, तुम्ही दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल, बोबडेपणाबद्दल भाष्य करता. मात्र, तुझ्या मुलाच्या आवाजाबद्दल कोणी म्याव म्याव आवाज काढला किंवा त्याच्याबद्दल काही म्हटले तर तुम्हाला वाईट का वाटते, असा सवाल त्यांनी केला. तर दुसऱ्यांची टिंगलटवाळी करताना स्वतःबद्दल पण ऐकण्याची थोडी हिंमत ठेवली पाहिजे, असा सल्लाही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीवर पाय ठेवला असता तर ती पडली असती असे म्हणतात. तर उद्धव ठाकरे तिथे उभे राहिले असते तर हवेने उडून गेले असते, असे आम्ही म्हणायचे का, असे देखील नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Nitesh Rane, Uddhav Thackeray
'आम्ही महाराष्ट्रातले नाही का?' मुख्यमंत्र्यांच्या त्या आरोपांवर दरेकरांचा सवाल

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. आपल्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणाले, सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम...अरे छट हा तर निघाला... आणखी एक टोमणे बॉम्ब...जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा! अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com