राणेंची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

राज्यात टाचणी पडली तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवतात.
Eknath Shinde, Nitesh Rane
Eknath Shinde, Nitesh Ranesarkarnama

मुंबई : ठाकरे सरकाला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षांतील सरकारच्या कामावर विरोधकांनी टीका केली. त्या संदर्भात भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे प्रमुख शिलेदार शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलची चर्चा रंगली आहे.

नितेश राणे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना ठाकरे सरकारने वेटिंगवर ठेवले आहे. पण उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करतील त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन राणे यांनी केले. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत राऊतांना मुख्यमंत्री पदांची स्वप्न पडत असल्याचे देखील राणे म्हणाले.

Eknath Shinde, Nitesh Rane
फडणवीसांच्या काळात मराठा समाजाची कामे झाली; ठाकरे सरकार मात्र...

ठाकरे सरकारवर टीका करताना नितेश राणे म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. तिन्ही पक्षांची मराठी आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका घेतली, हे जनता बघते आहे. राज्यात टाचणी पडली तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. संसदेत कायदा पारित केला गेला. सगळे अधिकार राज्य सरकारचे आहेत. राणे समिती स्थापन झाली. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिल गेले. केंद्राकडे हात पसरण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सक्षम आरक्षण दिले होते. सर्वांनी आरक्षण कायदा पारित केला. ठाकरे सरकार सत्ते आल्यापासून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली पाहिजे होती, असेही राणे म्हणाले.

केंद्र सरकारने कायदे पारित केले. सरकारने भोसले समितीने काय दिवे लावले, असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाने सरकारचा खरा चेहरा ओळखला पाहिजे. आतापर्यंत आयोग किंवा सर्वे केला नाही. फडणवीस मुख्यमंत्री असते तर आरक्षण सर्वोच न्यायालयात टिकले असते. उद्धव ठाकरेंनी कारभार कळत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी आयोग का स्थापन केला नाही. जाती साठी आवाज उठवता आला नाही का, दाढी वाढवून महाराज होता येत नाही, असा उपरोधिक टोला राणे यांनी शिंदेंना लगावला.

Eknath Shinde, Nitesh Rane
महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे ‘फसवणुकीची दोन वर्षे’

मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. उद्धव ठाकरे यांनी अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाच्या कामाची माहिती द्यावी. सारथी ची अवस्था काय केली. या सगळ्या बाबतीत मराठा समाजाचा कणा मोडण्याचे काम केले आहे. सर्वे आणि आयोग स्थापन होत नाही. राज्य सरकारने उत्तर दिले पाहिजे. पोलिस चांगल्या कामासाठी पाठवा. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरच्या बाहेर फोज फाटा ठेवला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद घेतात. त्यांच्या जावयाला अटक केली म्हणून ते समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com