`ठाकरे सरकारला खानाच्या मुलाची चिंता, पण पाटलाच्या मुलाची नाही!`

दोन वर्षात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकारबद्दल किती बैठका घेतल्या, असा सवाल राणे (Nitesh Rane) यांनी विचारला आहे.
`ठाकरे सरकारला खानाच्या मुलाची चिंता, पण पाटलाच्या मुलाची नाही!`
Nitesh RaneSarkarnama

पुणे : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारबर हल्लाबोल केला आहे. आज (ता. 24नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्य्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Nitesh Rane
राजकारण तापले; पाटील अन् महाडिक गट आमने-सामने

नितेश राणे म्हणाले, मराठा समजाने आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. आरक्षणासाठी समाजाच्या वतीने 58 मोर्चे काढण्याच आले. आता 59 वा मोर्चाही काढण्याची वेळ आली आहे. आज जर तुम्ही आवाज उठवला नाही तर, मराठा समाजाचे भविष्य हे अंधारत असेल, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, ठाकरे सरकारला आर्यन खानची चिंता आहे पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही. देशमुखाच्या मुलीची चिंता नाही. पण खानच्या मुलाची किती चिंता आहे, असा टोला राज्य सरकारला त्यांनी लगावला आहे.

मराठा समाजाने मागील दोन वर्ष नजरेसमोर ठेवले पाहिजेत व 58 मोर्चे काढणाऱ्या आमच्या मराठा समाजाच्या बांधवांनी तो काळ परत इथे आणला पाहिजे, असे आवाहनही राणेंनी केले. या सरकारला जर तुम्ही झुकवले नाही तर, हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. तसेच, अरबी सुमद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे स्मारक उभारले जात आहे. या दोन वर्षात ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्मारकारबद्दल किती बैठका घेतल्या. हे जरा मराठा समजाच्या लोकांना सांगावे आणि जर घेतल्या असतील तर, फोटो तरी दाखवा. घरी बसून बैठका घेतल्या असतील तर त्याचे मिनिट्स तरी दाखवा. असे आव्हान राणे यांनी केले.

Nitesh Rane
पवार म्हणाले, शशिकांत शिंदेंनी निवडणूक गांभीर्यांने घ्यायला हवी होती...

सारथी बाबत राणे म्हणाले, मराठा समजासाठी सारथी नावाची जी संस्था होती, जी आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजातील लोकांना ताकद मिळण्यासाठी उभी केली, चालवली आणि सक्षम करण्यासाठी सुरू केली. त्या सारथीची या सरकारने काय अवस्था करून ठेवली आहे? सारथी, किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ असो सगळ्या बाजुंनी मराठा समाजाचा कणा मोडण्याचे काम या राज्य सरकाराने केले आहे.

राणे म्हणाले, राज्य सरकारने हे आमचे राजकीय आरोप समजू नये. मात्र, मी त्यांना आव्हान करतो की, तुमच्यात हिंमत असेल, तर मराठा समजामध्ये एका मंत्र्याला पाठवा आणि त्यांच्यासमोर त्यांना बाजू मांडू द्या की, दोन वर्षात आरक्षणाबद्दल सरकारने नेमके काय केले. आज देखील आयोग स्थापन झालेला नाही, सर्वे होत नाही. मराठा समजाताली तरूणांचे दिवसेंदिवस वय वाढत आहे तरी, देखील नोकरीबद्दल कुठल्याही पद्धतीची शाश्वती राज्य सरकार त्यांना देऊ शकत नाही. यामुळे या बाबतीत राज्य सरकारने मराठा समाजाला उत्तर दिलेच पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in