इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार!

त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे.
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Rautsarkarnama

मुंबई : एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. वानखेडे यांच्या जन्मदाखल्याबाबत मलिकांनी केलेल्या खुलास्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले आहेत. इंटरव्हलपर्यंत मलिकांनी सांगितले, आता इंटरव्हलनंतर मी बोलणार, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, संजय राऊत बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार आहे, असा इशारा नितेश राणे यांनी राऊतांना दिला. प्रभाकर साईल असेल की मलिक असतील, ते जे आरोप करत आहेत त्याची शहानिशा होणारच आहे. त्यात कोणतेही दुमत नाही. आरोप आहेत, तुम्हाला आरोप सिद्धही करावे लागतात. प्रभाकर साईल नावाचा व्यक्ती पुढे येतो. तो कोण होता? त्याची पार्श्वभूमी काय? गेल्या १०-१५ दिवसात तो कुणाशी बोलला? या सगळ्या गोष्टींचा तपास झाला पाहिजे.

Nitesh Rane, Sanjay Raut
आम्हीही दररोज खोटे पुरावे सादर करू शकतो! यास्मीन वानखेडेंचा दावा

साईल जे बोलतोय ते तुम्ही सत्य मानत असाल, तर मग सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुशांतचा सर्वात जवळचा मित्र गणेश हिवरकर नावाचा व्यक्ती होता. तो टीव्हीवर सांगत होता, तो माझ्या घरी आला, त्यावेळी एक आमदार मित्रा माझ्यासोबत होते. त्याने मला सांगितले आहे, सुशांतसिंह आणि दिशा सालियान प्रकरणात नेमके काय झाले. त्याला कसे धमकावले गेले. या आघाडी सरकारमधील एक युवा मंत्री त्याला बाळासाहेब ट्ऱॉमा हॉस्पिटलमध्ये भेटायला आला, किती वाजता भेटायला आला. तो नेमके त्याच्याशी काय बोलला? हे सगळे संभाषण त्याने मला आणि माझ्या आमदार मित्राला सांगितले, असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला.

त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. प्रभाकर साईल जे बोलतोय ते तुम्ही खरे मानताय आणि माध्यमांमध्ये चालवताय. उद्या मी जेव्हा ही साऊंड क्लिप गणेश हिवरकरची जनतेसमोर आणेल, तो खरं समजून तुम्ही संबंधितांवर कारवाई करा आणि चौकशी करा, असा सवालही त्यांनी केला.

Nitesh Rane, Sanjay Raut
एनसीबीने आर्यनविरोधात प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राचाच घेतला आधार

राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला होता. वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितले ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन. या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होते त्याची चौकशी झाली पाहिजे, असे राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com