राज्यात फक्त ठाकरे सरकार नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू; राणेंनी पुन्हा डिवचले

अनिल परब मातोश्रीचे परिवार मंत्री आहेत.
Nitesh Rane, uddhav thackery Latest News
Nitesh Rane, uddhav thackery Latest Newssarkarnama

मुंबई : मुंबईची अवस्था २५ ते ३०वर्षात शिवसेनेनं (Shivsena) काय केली हे समजावे म्हणून ही पोलखोल सभा आहे. गेली अडीच वर्ष हे सरकार आहे ते लोकांसाठी चाललेलं नसून फक्त ठाकरे सरकार नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू आहे. किती येतात आणि कोण काय घेऊन येतो यावर हे सरकार अवलंबून आहे, अश्या शब्दात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Nitesh Rane, uddhav thackery Latest News
धनंजय मुंडेंना गुरूसमोर पदाचा पडला विसर : दर्शन घेऊन जमिनीवरच बसले

आज (ता. 20 मे) मुंबईत भाजपतर्फे पोलखोल मेळावा वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर टीका केली. शिवसेना वाढवण्यात उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे, असा सवाल करत गेल्या २५ ते ३० शिवसेनेने मुंबईची अवस्था काय केली हे समजण्यासीठी ही पोलखोल सभा आयोजित करण्यात आल्याचे राणेंनी सांगितले.

राणे म्हणाले, हाजी भाईंनी एवढे बॅनर लावले म्हणून शिवसेनेने पोलिसांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. हाजींना मी सांगतो की चार पाच बाहेर बॅनर कमी करा पण मातोश्री बाहेर एलईडी लावा. जेणेकरून मुख्यमंत्री आमचे भाषण ऐकतील. गेली अडीच वर्ष असलेलं हे सरकार लोकांसाठी चाललेलं नाही. ही फक्त ठाकरे सरकार नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू आहे. किती येतात आणि कोण काय घेऊन येतो यावर हे सरकार अवलंबून आहे, असा घणाघात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला.

Nitesh Rane, uddhav thackery Latest News
भाजप आक्रमक : ओबीसी मंत्र्यांनो सत्तेची लाचारी सोडा आणि राजीनामा द्या

ठाकरे सरकार लोकांना लुटत आहे. बाकी काहीच सुरू नाही. आपल्या राज्याला परिवहन मंत्री आहे का? ते अनिल परब मातोश्रीचे परिवार मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलतांना राणे म्हणाले, आता धर्मवीर नावाचा सिनेमा पहा कारण त्यात तुम्हाला कळेल, शिवसेना घडवण्यात उद्धव ठाकरेंचे काय योगदान होते ते, शेवटी कसे येतात पाहा. या सिनेमात राज ठाकरे आणि राणे साहेब येतात त्यांच्या मागे ते कसे येतात पाहा. उद्धव ठाकरे या सिनेमाचा शेवट न बघता निघून गेले. राणे साहेब आणि राज ठाकरे स्वतःच्या भावाला स्क्रिनवर बघावे लागू नये म्हणून ते निघून गेले, असा टोलाही राणेंनी लगावला.

Nitesh Rane, uddhav thackery Latest News
'शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळलीय का?'

राणे म्हणाले, राज्य सरकारला आमच्यावर केस टाकायची असेल तर आमच्यावर पोलिस सोडतात. यांच्यात आमच्यावर हल्ले करण्याची हिंमत नाही. पोलिसांच्या आडून हल्ले का करता? पोलिसांना बाजूला करा आणि मग या त्या वरूनला घेऊन परत तुझा तो भाचा दोन पायावर जातो का बघ, असा इशाराही राणेंनी दिला. पोलिसांना 50 लाखात घर देतात. पोलिसांनीही विचार केला पाहिजे. ज्यांच्यासाठी तुम्ही अंगावर येता तो तुमचा तरी आहे का? पोलीस राहतात तो मतदारसंघ आमच्या पेंग्विनचा. अरे बाळासाहेबांचा नातू ना आणि याचा आवाज कसा म्हणत अदित्य ठाकरेंची नक्कल करत खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com