हेच आहे का MyBmcचं धोरण? नितेश राणेंचा ठाकरेंना सवाल

उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे, हेच आहे का MyBmc चं धोरण? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.
 Nitesh Rane Aditya Thackeray
Nitesh Rane Aditya Thackeraysarkarnama

मुंबई : वरळी (Worli) मध्ये 30 नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. कामगार वसाहती मधील बीडीडी चाळीत (BDD Chawl) ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

यात आनंद पुरी (वय 27), मंगेश पुरी (वय 4 महिने), विद्या पुरी (वय 25), विष्णू पुरी (वय 5) अशी जखमींची नावे आहेत. यात चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. बीडीडी चाळीच्या या दुर्दैवी घटनेवरुन भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे यांनी याबाबतचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडीयावर शेअर करुन आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. त्या बाळाच्या उपचाराकडे रुग्णावयानं दुर्लक्ष केल्याचा आरोप राणेंनी केला आहे. ’उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे, हेच आहे का MyBmc चं धोरण? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

नितेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की 'माणुसकी जपा. कारण आपल्या’ कर्माचा’ हिशोब इथेच चुकवावा लागतो,’ छोट्याश्या चिमकुल्या बाळानं वेदनेने विव्हळत आपले प्राण सोडले. हीअत्यंत वेदनादायी घटना आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, या कुटुंबाला दुखातून सावरण्याचं बळ मिळो. @AdityaThackeray माणुसकी जपा. कारण आपल्या’ कर्माचा’ हिशोब इथेचं चुकवावा लागतो.

रुग्णालयात संबंधित रुग्णांवर उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप करणारी चित्रफित निदर्शनास आली असून त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयाचे उप-अधिष्ठाता सदर दिरंगाई प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशी अंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार व कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या कुटुंबाच्या उपचाराला नायर रुग्णालयात (Nait hospital) उशीर झाल्याने या प्रकरणी चौकशी समिती (investigation team) नियुक्त करण्यात आली आहे. जखमींपैकी तीन जणांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba hospital) दाखल केले होते. त्यामधील चार महिन्याच्या लहान बाळाचा मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com