'तो' व्हिडीओ व्हायरल अन् सोशल मिडीयावर निर्मला सीतारमण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

Nirmala sitaraman news| एनएसडीएलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
'तो' व्हिडीओ व्हायरल अन् सोशल मिडीयावर निर्मला सीतारमण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
Nirmala sitaraman news

Nirmala Sitaraman News

मुंबई : एनएसडीएलच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांचा एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंद्रू यांना पाणी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. निर्मला सीतारामन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एनएसडीएलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री निर्मला सीतारमण देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी NSDL गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम- 'बाजार का एकलव्य' लाँच करण्यात आला. NSDL च्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाच्या स्मरणार्थ या कार्यक्रमात टपाल तिकीट आणि कव्हर देखील लाँच करण्यात आले.

Nirmala sitaraman news
मोठी बातमी : भारतातील मुस्लिमांची संख्या वाढत नसून घटतेय!

नक्की काय झालं?

एनएसडीएलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंद्रू भाषण करत होत्या. भाषण करताना अचानक थांबल्या आणि त्यांनी हॉटेलच्या कर्मचार्‍यांना पाणी मागितले. त्यावेळी व्यासपीठावर निर्मला सीतारमणही बसल्या होत्या पद्मजा चंद्रू यांनी पाणी मागताच निर्मला सीतारमण उठल्या आणि त्यांनी पाण्याची बॉटल चंद्रू यांना दिली. त्यांनी सीतारमण यांनी दिलेलं पाणी प्यायलं आणि कार्यक्रमाला संबोधित करण्यास सुरुवात केली. अर्थमंत्र्यांचे हे वागणं पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या घटनेचा व्हिडीओही सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.

पद्मजा चंद्रू म्हणाल्या, “एनएसडीएलने 1996 मध्ये भारतात पहिले डीमॅट उघडले. एनएसडीएलची संपूर्ण भारतामध्ये 57,000 सेवा केंद्रांद्वारे सेवा प्रदान केली जाते. 27 दशलक्षाहून अधिक डिमॅट खाती आहेत आणि सिक्युरिटीजचे मूल्य चार ट्रिलियन पेक्षा जास्त आहे; ते लवकरच पाच ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. तर भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांनी विशेषत: गेल्या दोन वर्षांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.