निलेश राणेंना स्वत:ची अक्कल नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने राणेंची अक्कलच काढली
Nilesh Rane news
मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा नेत्या विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. (Ajit Pawar News)
त्याचं काय झालं राज्यसभेच्या निकालानंतर निलेश राणेंनी ट्विटरवर, “अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल. पण बरं झालं अजित पवार यात पडले नाहीत, कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार,” असे ट्विट करत अजित पवारांना टोला लगावला.
त्यानंतर निलेश राणे यांच्या ट्विटला विद्या चव्हाण यांनी ट्विटमधूनच सणसणीत उत्तर देत निलेश राणेंची अक्कलच काढली. “निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत,” असं ट्विट विद्या चव्हाण यांनी केलं. तसंच दूसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी, “निलेश राणे आपल्या बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांना स्वतःची अक्कल नाही. भाजपामध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतलं आहे त्यात नारायण राणेंची दोन मुलं अग्रेसर आहेत,” असा सणसणीत टोला लगावला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीने राज्यसभेच्या चारही जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी आमदारांची जमवाजमव केली होती. महाविकास आघाडीच्या तंबूत अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचे आमदार दाखल झाले. पण त्यातील काही जणांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याने राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेवर दिलेले उमेदवार संजय पवार पराभूत झाले आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.