वाझेंच्या घरात सापडल्या पिस्तुलाच्या 62 गोळ्या अन् त्यांचा सरकारी हिशेबच नाही!

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी एनआयएने केली आहे.
nia found 62 bullets in suspended api sachin vazes house
nia found 62 bullets in suspended api sachin vazes house

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांच्या कोठडीची मुदत 15 दिवस वाढवावी, अशी मागणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विशेष न्यायालयात केली. या वेळी वाझेंच्या घरात पिस्तुलाच्या 62 गोळ्या सापडल्या असून, त्यांची सरकारी नोंद नसल्याचा दावा एनआयएने केला आहे.  

वाझेंच्या एनआयए कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे त्यांना आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या कोठडीची मुदत 15 दिवस वाढवावी, अशी मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली. वाझेंच्या घरात पिस्तुलाच्या 62 गोळ्या सापडल्या आहेत. या गोळ्यांची नोंद नसून, त्यांचा कोणताही हिशेब दिसत नाही. त्यांना सरकारी पिस्तुलासाठी देण्यात आलेल्या 30 पैकी फक्त 5 गोळ्या सापडल्या आहेत. यातील उरलेल्या गोळ्या कुठे गेल्या हे सांगण्यास वाझे तयार नाहीत, असे एनआयएने सांगितला. 

एनआयएच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, वाझेंचा गुन्हा हा देशपातळीवरील एक मोठा गुन्हा आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास होणे हे महत्वाचे आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा अशा गुन्ह्यात सहभाग असणे ही शरमेची बाब आहे. 

यावर वाझेंचे वकील म्हणाले की, वाझेंबाबत  एनआयएकडे ठोस पुरावे नाहीत. कारण त्या गाडीत फक्त जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. डिटोनेटरशिवाय त्या कांड्या विस्फोटक मानल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत नोंदवलेली कलमे चुकीची आहेत. 

दरम्यान, सचिन वाझे, बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदे, बुकी नरेश गोरे व अन्य काही जणांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एनआयएचे अधिकारी या सर्वांचे डीएनए नमुने घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या गाड्यांमधून न्यायवैद्यक पथकाला मिळालेल्या पुराव्यामधील डीएनए व संशयित आरोपींचे डीएनए यांची पडताळणी करण्यात येणार आहे. हा अहवाल एक ते दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन हत्येच्या गुन्ह्यामध्ये दोन मर्सिडिज, एक इनोव्हा वापरली गेली, असा संशय आहे. एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्होल्व्हो व प्राडो या दोन गाड्यांमधूनही नमुने न्यायवैद्यक पथकाने घेतले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com