प्रदीप शर्माच मनसुख हिरेन हत्येचा सुत्रधार; वाझेकडून घेतले 45 लाख

राष्ट्रीय तपास यंत्रणेने याबाबतचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे.
Mansukh Hiren, Pradeep Sharma
Mansukh Hiren, Pradeep SharmaSarkarnama

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात आरोपी असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep sharma) हेच मनसुख हिरेन हत्येचे सुत्रधार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) याबाबतचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केले आहे. या प्रकरणाती आणखी एक प्रमुख आरोपी असलेल्या सचिन वाझे (Sachin Waze) याने शर्माला हत्येसाठी 45 लाख रुपये दिल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. (Mansukh Hiren Murder Case Update)

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर एक एसयूव्ही 25 फेब्रुवारीला बेवारस सापडली होती. त्यात स्फोटके आढळली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. नंतर या प्रकरणात सचिन वाझे याचे नाव समोर आले होते. त्यानंतर 5 मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील खाडीत सापडला होता. अँटिलिया समोर सोडलेली एसयूव्ही हिरेन याच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले होते. अखेर या प्रकरणातही वाझेचे नाव पुढे आले होते.

Mansukh Hiren, Pradeep Sharma
दलाल, गो बॅक! पक्षाच्या नेत्याविरोधातच चिदंबरम न्यायालयात; महिलेसह वकिलांनी दाखवला हिसका

स्फोटक प्रकरणात प्रदीप शर्मा याला एनआयएने मागील वर्षीच अटक केली असून ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर एनआयएने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत जामीनाला विरोध केला आहे. या प्रतिज्ञापत्रातच शर्मा हे हिरेन ह्त्येतील प्रमुख सुत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शर्मा यांच्या इतर आरोपींसह पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयातच अनेक बैठक घेतल्या आहेत. तिथेच हे षडयंत्र रचण्यात आले, असं प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Mansukh Hiren, Pradeep Sharma
संदीप देशपांडे पोलिसांच्या हातून निसटले; धावपळीत महिला कर्मचारी जखमी

वाझेने हत्येसाठी शर्माला 45 लाख रुपये दिले होते. शर्मा हे निर्दोष नसून त्यांनी षडयंत्र रचणे, खून, दहशत माजवण्याचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असे एनआयएकडून प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलै रोजी ठेवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com