'एनआयए'नं दोघांच्या मुसक्या आवळल्या; दाऊद अन् छोटा शकीलचे लोकेशन कळणार?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुरूवारी आरीफ शेख आणि शब्बीर शेख या दोघांना अटक केली आहे.
'एनआयए'नं दोघांच्या मुसक्या आवळल्या; दाऊद अन् छोटा शकीलचे लोकेशन कळणार?
Dawood Ibrahim Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरूवारी आरीफ शेख आणि शब्बीर शेख या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही गँगस्टर छोटा शकीलच्या जवळचे असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगच्या बेकायदेशीर कामांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा दावा 'एनआयए'ने केला आहे. (NIA latest Marathi News)

दाऊद इब्राहिमशी संबंधित एका प्रकरणामध्ये एनआयएकडून मुंबईत नुकतेच 29 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर आरीफ शेख व शब्बीर शेख यांची चार दिवस चौकशी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आले. दोघांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. (Dawood Ibrahim Latest Marathi News)

Dawood Ibrahim Latest Marathi News
पाच वर्षे काम केले तरच तिकीट! काँग्रेसमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांसाठी धोक्याची घंटा

दोन्ही आरोपी डी कंपनीसाठी काम करत होते. डी कंपनी अनेक दहशतवादी संघटनेच्या मदतीने भारतातील प्रमुख शहरांमध्ये घातपात करण्याचा यांचा कट होता. यासाठी मोठ्या प्रमाणात मनी लाँर्डिंग झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही आरोपी ९३ च्या स्फोटातील असून थेट कुख्यात गुंड छोटा शकिल याच्या संपर्कातले आहेत, असा दावा 'एनआयए'ने केला आहे.

घातपातासाठी छोटा शकीलकडून भारतात मोठ्या प्रमाणात पैसे पाठवण्यात आले. पाच लाखांची रोकड NIA च्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आली आहे. हे आरोपी डी कंपनीसाठी काम करत असल्याचेही ठोस पुरावे असल्याचा दावाही न्यायालयात करण्यात आला आहे.

Dawood Ibrahim Latest Marathi News
पक्षाचा एकमेव खासदार तरी पाचव्यांदा बनले पंतप्रधान; मोदींचे मानले आभार

दाऊद आणि छोटा शकीलच्या लोकशेन ट्रेस करणार?

आरोपींना छोटा शकीलकडून मोठ्या प्रमाणात पैसे आलेले आहेत. हे पैसे जर यांच्याकडून आले असतील तर ते बँक खाते आतापर्यंत सीज झालेले नाहीत, असं 'एनआयए'कडून न्यायालयात सांगण्यात आले. छोटा शकिल आणि दाऊद यांचे लोकेशन काढण्यासाठी 'एनआयए'ने कोठडी मागितली आहे. त्याला विरोध केल्याचे दोघांचे वकील अपेक्षा व्होरा यांनी सांगितले. इंटरपोलच्या मदतीने ते लोकेशन ट्रेस करू शकतात, असंही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.