PFI : पाच वर्षांच्या बंदीनंतर पीएफआयला NIAचा आणखी मोठा दणका

PFI : पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे.
PFI latest news
PFI latest newssarkarnama

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’ने देशभरात पीएफआय (PFI) संघटनेच्या ठिकाण्यांवर छापे टाकत अनेकांना अटक केली होती. त्यानंतर बुधवारी या संघटनेवर बंदी घातली आहे. एनआयएने (NIA)आता पीएफआयच्या विरोधात कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

‘एनआयए’ने देशभरातील पीएफआयची सुमारे ३४ बँक खाती गोठवण्यास सुरवात केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे.

पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली आहे. याबाबत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानत पीएफआय वरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याच सोबत मागील आठवड्यात पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद अश्या घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

PFI latest news
Shiv Sena : बाळासाहेबाचं धनुष्यबाण पळविणाऱ्यांच्या विरोधात आम्ही लढू ; पेडणेकर आक्रमक

अनेक देश विघातक कृत्यात पीएफआय संघटना सामील असल्याचे पुरावे ‘एनआयए’च्या हाती लागले होते. मागील कालखंडात देशात घडलेल्या काही धार्मिक दंगली, घटना आदीमध्येही पीएफआय संघटनेचा थेट सहभाग आढळून आला होता.या संघटनेवर भारतात पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. सोबतच ‘पीएफआय’शी संबधित संघटनांवरही बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएफआय दिल्ली, आंध्र प्रदेश , आसाम, बिहार, केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात सक्रिय आहे. 15 राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या या संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानं पीएफआयचं धाबं दणाणलयं आहे. एनआयएकडून कसून तपास केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in