राज्यात १८ जुलैनंतर मंत्रीमंडळ विस्तार होणार?

रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार राष्ट्रपती निवडणुकीनंतर होणार.
Deepak Kesarkar
Deepak KesarkarSarkarnama

नाशिक : राज्याचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्यासाठी १८ जुलैचा मुहुर्त निवडण्यात आला आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यावर त्याबाबत वरीष्ठ नेते निर्णय घेतील, अशी माहिती एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. (Cabinet wxtension after presidential election)

Deepak Kesarkar
रविकांत तुपकरांच्या धडक आंदोलनाने महावितरण हादरले!

गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अनिश्चितता असल्याने सध्या केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एव्हढेच सरकार आहे. याबाबतची अनिश्चितता केव्हा संपणार याबाबत केसरकर यांनी खुलासा केला आहे.

Deepak Kesarkar
मला मंत्री करा, असे एकनाथ शिंदेंना कधीही म्हटलो नाही!

आमदार केसरकर म्हणाले, मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक नसती तर कदाचीत यापूर्वीच तो विस्तार झालेला दिसला असता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करायचे आहे. आम्ही मतदान कसे करणार हे आमदारांना समजावून सांगायचे असते.

सगळेच शिक्षीत असले तरीही मतदानाची प्रक्रीया समजावून सांगावी लागते. त्याची प्रॅक्टीस करावी लागते. सर्व मते व्यवस्थित व्हावीत, त्यात चुक होऊ नये याची आम्हाला काळजी आहे. शेवटी हा भावनेचा प्रश्न आहे. त्यात चुक होऊ नये, यासाठी सर्व दक्षता घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजप तसेच शिवसेनेचा बंडखोर गट यांच्यातील अनेकांना मंत्रीपदाची आस लागली आहे. त्याबाबत विविध नावे चर्चेत आहेत. विशेषतः बंडखोर गटातील जवळ जवळ प्रत्येक आमदारांना मंत्री होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या समर्थकांना देखील हीच अपेक्षा असल्याने मंत्रीमंडळ विस्ताराची सगळ्यांना अपेक्षा आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in