शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का; शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेच्या (ShivSena) नवीन पदांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेच्या (ShivSena) नवीन पदांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली.

Eknath Shinde
उद्धवजी, ती शस्त्रक्रियेची गुंगी नव्हती, तर सत्तेची धुंदी होती…

तर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम राहणार आहेत. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत (Uday Samant), किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Eknath Shinde
शिंदेंसोबत गेले कुटुंबच फुटले; खासदार प्रतापराव जाधवांना मोठा धक्का : भावानेच साथ सोडली

शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in