जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची रणनीती गुलदस्त्यात; काँग्रेस, शिवसेना देणार दुसरा पर्याय   

राष्ट्रवादीविरोधात भाजपचे पॅनेल होईल, अशी चर्चा होती; पण अद्यापपर्यंत तरी सर्वाधिक मते असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यापर्यंत भाजपचे कोणीही नेते चर्चेसाठी पोचलेले नाही. त्यामुळे भाजपकडून पॅनेलची बांधणी होणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची रणनीती गुलदस्त्यात; काँग्रेस, शिवसेना देणार दुसरा पर्याय   
NCP's strategy in District Bank in bouquet; Congress, Shivsena will give another option

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अद्याप रणनीती ठरली नसल्याचे सांगितले जात आहे. विविध सोसायटी गटातून दाखल झालेल्या ठरावांनुसार कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव, माण या सोसायटी गटातून विद्यमान संचालकांविरोधात इच्छुकांचे ठराव असल्याने या ठिकाणी निवडणूक लागू शकते. भाजपच्या पॅनेलविषयी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंपर्यंत कोणीही चर्चेला पोचलेले नाही. राष्ट्रवादीने सर्वांशी जुळवून न घेतल्यास काँग्रेस व शिवसेना एकत्रित पॅनेल करण्याची शक्यता आहे. NCP's strategy in District Bank in bouquet; Congress, Shivsena will give another option
 
या बॅंकेची निवडणूक सर्वपक्षियांना सामावून घेऊन बिनविरोध करण्याबाबतचे प्रयत्न काही नेत्यांचे सुरू असले, तरी अद्याप तरी त्या विषयी कोणतीही बैठक अथवा चर्चा झालेली नाही. बॅंकेच्या निवडणुकीचे ठराव कोल्हापूरच्या सहनिबंधकांकडे पाठविण्यात आले आहेत. या ठरावावरून शुक्रवारी (ता. ३) कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

आजपर्यंत सोसायटी मतदारसंघाच्या सहा जागा बिनविरोध होत होत्या. मात्र, यावेळेस यातील केवळ तीन चार जागाच बिनविरोध होतील, अशी शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी विद्यमान संचालकांसोबत इतरांचेही ठराव आलेले आहेत. त्यामुळे कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव या सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लागू शकते. आमदार जयकुमार गोरे यांचे १२ ठराव जिल्हा बॅंकेने रद्द केले आहेत. त्यामुळे कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ते कोणती भूमिका घेणार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

माण सोसायटी मतदारसंघातून सर्वाधिक ठराव आमदार जयकुमार गोरे यांचे, तर त्यानंतर शिवसेनेचे नेते शेखर गोरे व सर्वात कमी ठराव राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावरच आमदार गोरे आपले पत्ते ओपन करणार, हे निश्चित आहे. पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यात लढत आहे. मंत्री देसाई स्वत: रिंगणात उतरणार की त्यांचा प्रतिनिधी यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. 

कऱ्हाडमधून पालकमंत्री बाळासाहेब पाटील व ॲड. उदयसिंह पाटील यांचे ठराव आहेत. भाजपचेही काही ठराव आहेत. ते कोणाच्या पारड्यात पडणार हेही महत्त्वाचे आहे. जावळीतून आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांचे ठराव आहेत. वाईतून मकरंद पाटील, नितीन पाटील यांचे ठराव असून भाजपचे नेते मदन भोसले यांच्याकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. 

महाबळेश्वर, सातारा, कोरेगाव, खंडाळा मतदारसंघातून विद्यमान संचालकांच्या नावाने ठराव आहेत; पण त्यांच्याविरोधात सक्षम विरोधकांचे ठराव नसल्याने या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीविरोधात भाजपचे पॅनेल होईल, अशी चर्चा होती; पण अद्यापपर्यंत तरी सर्वाधिक मते असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यापर्यंत भाजपचे कोणीही नेते चर्चेसाठी पोचलेले नाही. त्यामुळे भाजपकडून पॅनेलची बांधणी होणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिवसेनेने जिल्हा बॅंकेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीने सामावून घेऊन काही जागा दिल्या तर ठिक अन्यथा काँग्रेस व इतरांना सोबत घेऊन शिवसेना दुसरा पर्याय उभा करण्याची शक्यता आहे. 

आमदार शिंदे अडचण सोडविणार....

जावळी सोसायटीतून आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचे ठराव झालेले आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदेंपुढे अडचण निर्माण झाली आहे. आजपर्यंत जावळी तालुक्याने आमदार शिंदेंना साथ दिली आहे; पण यावेळेस त्यांच्याविरोधात उमेदवार असणार आहे. जिल्हा बॅंकेच्या नोकर भरतीत आमदार शिंदेंकडून कोरेगावातील लोकांचा विचार केला जात असल्याने जावळीकरांत नाराजी असल्याचे बोलले जाते. शिवेंद्रसिंहराजे हे त्यांच्या समर्थकाला काय सूचना करणार यावर या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. 

Related Stories

No stories found.