नाना पटोले हेच खरे गुन्हेगार; राष्ट्रवादीचा पलटवार

काँग्रेसने (Congress) भंडारा जिल्हा परिषदेत भाजपच्या (BJP) वाघमारे यांच्या गटाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे.
Suraj Chavan, Nana Patole
Suraj Chavan, Nana Patolesarkarnama

भंडारा : भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia) पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याची जहरी टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. त्याच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार पटलवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी ट्वीट करत पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. चव्हाण आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ''स्वतः पाठीत सुरा खुपसून चाकू दुसऱ्याच्या हातात दिल्याने गुन्हेगाराचा गुन्हा लपत नसतो. नाना पटोलेजी कोणी कोणाच्या पाठीत सुरा खुपसला हे महाराष्ट्र्र बघतोय.'' अशा शब्दांत चव्हाण यांनी पटोले यांना सुनावले आहे.

Suraj Chavan, Nana Patole
नानांच्या प्रेमातील वाघमारेंनी बावनकुळेंची विनंती धुडकावली... अखेर कठोर कारवाई

पटोले म्हणाले होते, राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यासोबत माझे बोलणे झाल्यावरसुद्धा त्यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.

Suraj Chavan, Nana Patole
राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला : नाना पटोले चिडले

दरम्यान, भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटासोहत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे ५ आणि १ अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक २१ सदस्य असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा १, शिवसेना १, वंचित १ आणि अपक्ष २ अशा सदस्यांची साथ मिळाली. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या ७ सदस्यांनी राष्ट्रवादीची साथ दिली. राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. भंडारा जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com