मोठी बातमी ! भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीही सहभागी होणार

Bharat Jodo Yatra | NCP| काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी (7 नोव्हेंबर) महाराष्ट्रात पोहोचली आहे.
Bharat Jodo Yatra  Sharad Pawar News, Nanded
Bharat Jodo Yatra Sharad Pawar News, NandedSarkarnama

Bharat Jodo Yatra | मुंबई : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी पण मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १० नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे माजी मंत्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. तर हिंगोलीमध्ये आमदार रोहित पवार यात्रेत सहभागी होतील आणि बुलढाण्यात माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राजेंद्र शिंगणे हे नेते यात्रेत सहभागी होणार आहेत.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी (7 नोव्हेंबर) महाराष्ट्रात पोहोचली आहे. दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरू झालेला हा प्रवास कर्नाटकातून तेलंगणा आणि आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. सोमवारी रात्री नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेने प्रवेश केला. हजारो मशाली घेऊन राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाले. तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल होताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी नाना पटोले यांच्याकडे तिरंगा ध्वज सुपूर्द केला. यावेळी राहुल गांधी यांचे मराठा स्टाईलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

Bharat Jodo Yatra  Sharad Pawar News, Nanded
हा अपमान खपवून घेणार नाही, बिनशर्त माफी मागा : शालिनी ठाकरेही संतापल्या

राहुल गांधी यांचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया विभाग प्रमुख जयराम रमेश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, प्रदेश प्रभारी एच. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. महाराष्ट्रात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेही सहभागी होऊ शकतात, असंही बोललं जात आहे. याला अद्याप दुजोरा मिळालेला नसला तरी काँग्रेसच्या या भेटीला दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता या यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in