'नडला त्याला फोडला' : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा नवा फतवा

NCP comments on Ketaki chitale | Sharad Pawar| वादग्रस्त पोस्ट प्रकराणी केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
'नडला त्याला फोडला' : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा नवा फतवा
NCP comments on Ketaki chitale

NCP comments on Ketaki chitale

सोलापूर : अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तिला अटकही झाली. राज्यभरातून तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनीही तिच्यावर निशाणा साधला. दूसरीकडे आता राष्ट्रवादीची विद्यार्थी कॉंग्रेसही आक्रमक झाले आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष असलेल्या सुहास कदम यांनी अशा टीका करणाऱ्या लोकांविरोधात फतवाच काढला आहे. इथून पुढे शरद पवार आणि पवार कुटुंबियांबद्दल टीका करणाऱ्यांना शोधा व फोडा, असा फतवा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने काढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेससाठी त्यांनी फतवा जारी केला आहे. जे शरद पवार आणि त्यांच्या परिवारावर खालच्या भाषेत टीका करतील अशा लोकांना शोधा आणि फोडा अशी मोहीम सुरू करण्यात यावी, असा आदेश काढण्यात आला आहे.

NCP comments on  Ketaki chitale
केतळी चितळेला न्यायालयाकडून दणका; स्वत:च मांडली बाजू

दरम्यान, वादग्रस्त पोस्ट प्रकराणी केतकी चितळेला काल ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर आज (१५ मे) रविवारी सकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील घेतला नाही. तिने स्वत:च न्यायालयात बाजू मांडली. सोशल मीडियात व्यक्त होण्याचा आपल्याला अधिकार नाही का, असा सवाल तिने न्यायालयात उपस्थित केल्याचे समजते. त्यानंतर तिला कोठडी सुनावण्यात आली.

तर दूसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनीदेखील टीकाकारांना इशारा दिला आहे. टीका करण्यास आमचा विरोध नाही संविधानाने प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार दिला आहे. पण टीका करताना ती संयमाने केली पाहिजे. केतकीने समाज माध्यमांवर ज्या भाषेच आपली मते मांडली आहेत, त्या विकृतपणाचा राष्ट्रवादी विरोधच करणार. केतकी सारख्या लिहीणाऱ्या मग तो निखील भामरे असेल, सुनैना होळे असो वा कादंबरी नाईक असेल, या सर्वांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महाराष्ट्र दर्शन नक्की घडवतील, असा इशाराही परांजपे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in