(ncp mla Jitendra Awhad resign news update)
(ncp mla Jitendra Awhad resign news update)sarkarnama

NCP : आव्हाडांवरील गुन्ह्याबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ; महिला लोकप्रतिनिधी आक्रमक

NCP : "जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. या प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत,"

NCP : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आव्हाडांसाठी महाविकास आघाडीतील महिला नेत्या एकवटल्या आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी कोर्टात जाणार आहे. (ncp mla Jitendra Awhad resign news update)

आघाडी सरकारमधील महिला खासदार,आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. राज्यपालांची भेट घेऊन काल रात्री नेमकं काय घडलं, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती राज्यपालांनी दिली.

भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. या प्रकरणी आपण कोर्टात जाणार आहेत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण (vidya chavan)यांनी दिला.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनिषा कायंदे, आमदार अदिती तटकरे, विद्या चव्हाण, आमदार ऋतुजा लटके आदी उपस्थित होते.

 (ncp mla Jitendra Awhad resign news update)
Ashish Shelar : आव्हाड, 'राजीनामा द्या, ती जागाही आम्ही जिंकू ' ; शेलाराचं खुलं आव्हान

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहखात्याचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खात्याचा कारभार स्वतःकडे घ्यावा," अशी मागणीही चव्हाण यांनीकेली. विद्या चव्हाण म्हणाल्या, "जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. या प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत,"

राज्यपालांकडे महिलांबद्दल वादग्रस्त आणि बेताल वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांची तक्रार शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. गेल्या काही दिवसांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून एक पत्र दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com