'उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपमधील एक गट अस्वस्थ!'

जयंत पाटील (Jayant Patil) यांची भाजपवर टीका
Jayant Patil & Devendra Fadanvis
Jayant Patil & Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : दिल्लीत वाऱ्या करणे... फुटीरांमधील मतभेद मिटवणे... त्यांच्या समजूती घालणे, उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपमधील (BJP) एक गट अस्वस्थ आहे. या सगळ्या व्यापात सध्याचे सरकार व्यस्त आहे. म्हणून ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

Jayant Patil & Devendra Fadanvis
पंचायत समिती निवडणूक : विद्यमान सभापती व उपसभापतींसह अनेक दिगजांना धक्का

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार येऊन २५ पेक्षा जास्त दिवस झाले तरी राज्याला मंत्रिमंडळ नाही, याबाबत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्या अहवालामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. मात्र, सरकारला त्यावर लक्ष देता आले नाही.

Jayant Patil & Devendra Fadanvis
गद्दारांनी कितीही गैरसमज पसरविले तरी... : शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना टोला

सरकार दिल्ली वाऱ्यांमध्ये जरजर झाले, असल्यामुळे दुर्लक्ष झाले. नाहीतर ९२ नगरपालिकांमध्ये आरक्षण मिळाले असते, असा टोला पाटील यांनी लगावला. वर्धा, नांदेड, यवतमाळ महाराष्ट्राच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मात्र, सध्या पालकमंत्री नसल्याने तिथे ठामपणे कोणी उभे राहत नाही. मदतकार्याला कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नाही. म्हणून मदतकार्य नीट होत नाही. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले, मात्र अश्रू पुसण्यासाठी कुणीही नाही, असा आरोप पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in