
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. सोमवारी (दि.15 मे) ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीने नोटीस दिल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यामांशी याबबात प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, "मला काल संध्याकाळी इडीची नोटीस आली आहे. या नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्यातील फाईल काढून पाहिल्या तर IL&FS नावाची कुठली तरी संस्था आहे. त्यासंबधीची ही केस आहे. पण या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही".
"कधी IL&FS नावाच्या कंपनीकडून लोन घेतले नाही. पण तरीही मला नोटीस आलेली आहे. त्यामुळे ते जी काही चौकशी करणार आहेत, त्याला सामोरं जाऊ. मात्र, सध्या दोन-तीन दिवस सध्या लग्नसराई आहे. काही जवळच्या व्यक्तींचे लग्न आहेत. त्यामुळे मी दोन-तीन दिवसांचा वेळ त्यांच्याकडून मागवून घेणार आहे", असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.
प्रकरण नेमकं काय?
जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल आणि एफएलएस या प्रकरणी 'ईडी'ने नोटीस पाठवली आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही 'ईडी'ने चौकशी केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. तर आता 'ईडी'ने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली असून नोटीसीच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
(Edited By - Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.