
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.
तसचे राज्यात इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधीच झाले नाही, असेही पाटील म्हणाले. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांच्या पासून किती सन्मानाने राहिलेला आहे. आपण हे पाहिले, आता अशा पद्धतीने वातावरण खराब करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केला जात आहे. आपण सत्तेच्या बाहेर आहोत याचे दुःख आणि वैषम्य सतत व्यक्त कारणे हे मोठे दुर्देवी आहे, असे सांगत त्यांनी भाजपवर (BJP) टीका केली.
राणा दांपत्याच्या हनुमान चालीसीवर बोलताना पाटील म्हणाले, लोकशाहीत अशा पद्धतीने वागून चालत नाही. ज्या बाळासाहेबांनी भाजपला हिंदुत्व शिकवले त्या बाळासाहेबांच्या घरावर जाऊन हनुमान चाळीसा म्हणणे म्हणजे हे दुर्देवी असल्याचे पाटील म्हणाले. यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
लोकशाहीत अशा गोष्टी करायच्या नसतात. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, असे बोलत असाल तर पोलिस त्यांचे काम करणारच असेही पाटील म्हणाले. भाजपचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका एकच आहे का असा प्रश्न पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, अर्थात असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
त्याच बरोबर पाटील म्हणाले, सरकार पडत नाही, सरकारच्या विरोधी बोलण्यासारखे काहीच नाही. सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा वापरुन झाल्या आहेत. पक्ष फोडण्याचेही प्रयत्न झाले. त्यामुळे आता शेवटचे अस्त्र म्हणून रडीचा डाव खेळला जात आहे. तुम्ही जर शिवसेनेच्या (ShivSena) घरावरचर जाणार असाल तर ते आक्रमक होणारच. शिवसेनेला आपण आतापर्यंत पाहिले आहे ते आक्रमक असतात, असेही पाटील म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.