एनसीबीच्या पथकात भाजपचे पदाधिकारी; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

या दोन व्यक्तींसदर्भात एनसीबीने खुलासा करावा
एनसीबीच्या पथकात भाजपचे पदाधिकारी; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
Nawab Maliksarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) कामकाजावर आक्षेप घेत विविध आरोप केले आहेत. मुंबईतील हे पथक खंडणीच्या कामात अडकल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करतेवेळी भाजपशी संबंधित दोन व्यक्ती उपस्थित होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. (BJP criticizes NCP spokesperson Nawab Milk)

 Nawab Malik
सुनील केदारांना हायकोर्टाचा दणका : 'दूध पंढरी' वरील पापळांची नियुक्ती रद्द

नवाब मलिक यांनी आज (ता. ६ ऑक्टोबर) दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एनसीबीवर आरोप केले. NCB ने आतापर्यंत आपल्या कामाचा दर्जा राखला होता. मात्र, अभिनेता सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई आणि बॅालिवूडला बदनाम करण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून धमकावण्यात आले. तसेच खंडणी मागण्याचे काम सुरू झाले. येथील विभागीय अधिकारी यांनी सोयीने पत्रकारांना बातम्या दिल्या, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.

 Nawab Malik
चार वर्षांच्या मुलीनं काढलेल्या ईश्वरचिठ्ठीनं ठरवलं काँग्रेस अन् शिवसेनेच्या उमेदवाराचं भविष्य

मलिक म्हणाले, ''आर्यनखान याच्यावर कारवाई करताना जे अधिकारी म्हणून सोबत होते ते भाजपचे कार्यकर्ते निघाले आहे. मनीष भानुशाली आणि गोसावी हे दोन एनसीबीशी संबंध नसलेल्या व्यक्ती आर्यन खानला घेऊन कार्यालयात जाताना दिसत आहेत. या दोन व्यक्तींसदर्भात एनसीबीने खुलासा करावा. आर्यन खान याच्यावर कारवाई होण्याच्या काही दिवस आधी भानुशाली हा गुजरातमध्ये होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा भाजप नेत्यांसोबत भानुशालीचे फोटो आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.