अजितदादांनी कठीण काळात राज्याची तिजोरी सुरक्षित ठेवली म्हणून..! राष्ट्रवादीनं घेतलं क्रेडिट

शिंदे सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात...
Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्यातील पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच रुपये व तीन रुपये कपात करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) पहिली प्रतिक्रिया आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले अजित पवार यांनी कठीण काळात धोरणात्मक निर्णय घेऊन राज्याची तिजोरी सुरक्षित ठेवल्यामुळेच हा निर्णय घेता आल्याचा टोला राष्ट्रवादीनं लगावला आहे. (Ajit Pawar Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी या निर्णयानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, आज शिंदे सरकारने पेट्रोलचे दर पाच रुपये आणि डिझेलचे दर ३ रुपये दर कमी केल्यानंतर महेश तपासे यांनी यामागे महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांचे श्रेय असल्याचे सांगितले आहे.

Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
शिंदे सरकारचं महाराष्ट्राला पहिलं मोठं गिफ्ट; पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा

पेट्रोल-डिझेलवरील दर कपात केली मात्र हे शिंदे सरकार येताच केंद्र सरकारने सामान्य माणूस आणि गृहिणींच्या किचनवर आर्थिक बोजा जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या जीएसटीच्या रुपाने टाकला आहे. एकीकडे जनतेला दिलासा देत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे त्याअगोदर स्वतः च्या तिजोर्‍या भरुन घेण्याचे काम भाजपने केले आहे असा आरोपही तपासे यांनी केला आहे.

दर कपातीची घोषणा करताना काय म्हणाले शिंदे?

शासनाने काही लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. हे सरकार सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारे सरकार आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम पुढील काळात करणार आहे. याची सुरूवात पहिल्याच कॅबिनेटमध्ये सुतोवाच केले होते. देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर व 22 मे रोजी करात कपात केली होती. त्यांनी राज्य सरकारलाही कर कमी करण्याचे आवाहन केलं होतं. परंतु काही राज्यांनी सुचना मान्य करून कर कमी केला होता, असं शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने कर कमी केला नव्हता. आता युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आज पेट्रोलवर पाच रुपये व डिझेलवर तीन रुपये दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सहा हजार कोटी रुपयांचा भार शासनावर भार पडणार आहे. जनतेला यातून दिलासा मिळेल. डिझेलच्या दरवाढीमुळे वाढलेली महागाईतूनही दिलासा मिळणार आहे. पेट्रोलमध्ये दर कमी केल्याने नागरिकांनाही दिलासा मिळेल, असं शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com