'भाजपने दिलेली स्क्रिप्टच गिरवायची; एवढेच काम राज ठाकरेंना राहिले आहे!'

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांची राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका
'भाजपने दिलेली स्क्रिप्टच गिरवायची; एवढेच काम राज ठाकरेंना राहिले आहे!'
Raj Thackeray, Mahesh Tapasesarkarnama

मुंबई : माझी दोन भाषणे काय झाली सगळे फडफडायला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) काय सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी आणि राज्यासाठी चांगले नाही. शरद पवार यांनी जातीजातीमध्ये विष पेरले त्यामुळे समाजात दुही निर्माण झाली, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. त्यावर आता राष्ट्रवादीने आक्रमक उत्तर दिले आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. तपासे म्हणाले, राज ठाकरे यांनी शिक्षणाचा, आरोग्याचा, रोजगाराचा, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचा अल्टिमेटम दिला असता तर आम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत केले असते. मात्र, भाजपने दिलेली स्क्रिप्टच गिरवायची आता एवढेच काम राज ठाकरेंना राहिले आहे, असा टोला तपासे यांनी लगावला आहे. या भाषणाकडे कानाडोळाच करणे महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचेही ते म्हणाले.

Raj Thackeray, Mahesh Tapase
येत्या चार मेनंतर मी कुणाचेही ऐकणार नाही; अभी नही; तो कभी नही : राज ठाकरे आक्रमक!

स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारचा नवीन सामाजिक व राजकीय विचार राज ठाकरे देऊ शकले नाही. म्हणूनच आतापर्यंत राजकारणात त्यांचा पक्ष अपयशी ठरलेला आहे, अशी जोरदार निशाणा तपासे यांनी साधला. पवारसाहेबांसारख्या कृतिशील नेत्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही, आणि म्हणूनच त्यांच्यावर काही नेते बोलतात. पवारसाहेबांच्या नखाइतकी उंची जर राज ठाकरेंची असती तर नक्कीच ते एक कर्तुत्ववान नेते म्हणून राज्यामध्ये वावरले असते, असेही तपासे म्हणाले.

महाराष्ट्रात जातीय व धार्मिक एकात्मता राखण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम आहे. म्हणूनच काही लोकांच्या भाषणाकडे कानाडोळा करणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

पवार नास्तिक आहेत असे मी म्हटलो तर ते त्यांना लागले. मला जे माहिती आहे तेच मी सांगितले. त्यानंतर लगेच फोटो यायला लागले. सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहे. जिकडे सभा घेतात तिथे सांगतात राज ठाकरे यांनी आजोबांची पुस्तके वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवे ते न वाचता सगळी पुस्तके वाचली पाहिजे. मी सर्व वाचले आहे. ते सर्व लेखन परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारे ते लीखान नाही. हिंदू धर्माची पूजा करणारा माणूस होता. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी बोट ठेवले आहे. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होते, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Raj Thackeray, Mahesh Tapase
फडणवीसांनी एका दमात घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; दंतकथा, धक्का, पाठीत वार, खेळ अन्...

माझ्या आजोबांचे चरित्र आहे. 'माझी जीवनगाथा'. हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेले काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ माझ्या आजोबांनी सुरु केली होती. रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात का? त्यांनी कधी म्हणाले होते का ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिले आहे, त्याच्याइतके उत्कृष्ट लिहिलेल कुठेही वाचलेले नाही. शरद पवार यांना हिंदू या शब्दाची मुळात अ‍ॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकरांचा आहेच. मात्र, त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. पण शरद पवार यांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.