
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात घमासान सुरू आहे. प्रत्येक मत महत्वाचे असल्याने महाविकास आघाडी आणि भाजपकडून अपक्ष आमदारांसाठी फोना फोनी सुरु आहे. या घडामोडीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्त महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपवर (BJP) जोरादार टीका केली आहे. (Rajya Sabha Election Latest News)
तपासे म्हणाले, घोडेबाजारीला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची असून राज्यसभेच्या (RajyaSabha election) निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही तपासे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून राज्यसभेसाठी मुद्दामहून सातवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. घोडेबाजार करुन आमदार फुटतील असा प्रयत्न भाजपचा आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला.
महाविकास आघाडीला समर्थन देणारे घटक पक्ष आणि अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. जेव्हा राज्यसभेचे मतदान होईल त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असेल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आलेले असतील, असेही तापसे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.