'मुंबई पोलीसांचे मनोबल खच्चीकरणाचा राणांचा डाव!'

संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Navneet Rana, Mahesh Tapase
Navneet Rana, Mahesh Tapasesarkarnama

मुंबई : मागसवर्गीय असल्याने पोलिसांनी वाईट वागणूक दिली, असा जातीयवादी आरोप करून मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाला बदनाम करायचे... अधिकार्‍यांचे... कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा खासदार नवनीत राणा यांचा डाव होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.

'मातोश्री' विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी पोलीस ठाण्यात आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. या संबंधी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांना एक पत्र लिहिले असून त्यामध्ये हा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी याबाबत एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

Navneet Rana, Mahesh Tapase
देशमुखांना क्लिनचिट? चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे

संजय पांडे यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले जात आहे. 'आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,' असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले. पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे. त्यावरुन तापसे यांनी निशाणा साधला आहे.

Navneet Rana, Mahesh Tapase
'कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने नवनीत राणांना आता जात आठवली'

मुंबई पोलिस जातीयवादी असल्याचा आरोप राणा यांनी त्याची लेखी तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलीस ठाण्यात चहापान करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे जातीच्या नावावर खोटी तक्रार करणार्‍या नवनीत राणा यांच्यावर लोकसभा अध्यक्ष कोणती कारवाई करणार आहे, असा सवालही तपासे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com