'त्या' आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीने राजकारण करू नये; भाजपचा सल्ला...

NCP |BJP : प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनविला होता.
Crime News , NCP, BJP
Crime News , NCP, BJP Sarkarnama

डोंबिवली : संदप येथील एका केबल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही आत्महत्या केबल व्यवसायातील छळामुळे करत असल्याचा व्हिडीओ मयत प्रल्हाद पाटील यांनी केला होता. यामध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांचे नाव त्यांनी घेतले होते.

दरम्यान, या आत्महत्या प्रकरणात भाजपा कार्यकर्त्याच्या काही संबंध नाही. माळी यांचे नाव यात गुंतविले जात आहे. राष्ट्रवादी (NCP) याचे राजकारण करत असून त्यांनी या प्रकरणाचा आधी अभ्यास करावा, असा सल्ला भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. तर कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी राष्ट्रवादीकडून दबावतंत्रचे राजकारण केलं जात असल्याचा आरोपही केला आहे. (Crime News , NCP, BJP )

Crime News , NCP, BJP
नवाबसेना प्रमुखांचं ढोंगी हिंदुत्व अन् मराठी प्रेम जनतेला कळून चुकलंय; मनसेनं पुन्हा डिवचलं...

डोंबिवली जवळील संदप गावात राहणारे प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या केली असून त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनविला आहे. व्यवसायात त्यांना त्रास दिला जात आहे, असे म्हणत त्यांनी काही लोकांची नावे त्यात घेतली आहेत. याप्रकरणी भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांच्यासह 15 जणा विरोधात ठाणे जिआरपी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत संदीप माळी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. भाजपच्या नेत्यांचे संदीप माळी यांना पाठबळ असल्याचा देखील आरोप तपासे यांनी केला होता.

त्यानंतर भाजपाने राष्ट्रवादी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेत भाजपा कार्यकर्त्याला यात गुंतविले जात असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब, नंदू जोशी, अमर माळी, रविना माळी आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Crime News , NCP, BJP
Shivsena : अंबादास दानवे म्हणाले, हो भुमरे नमकहरामच..

शशिकांत कांबळे म्हणाले, तपासे यांना दुसरं काही पक्षाने काम दिले का नाही हेच मला कळत नाही. कारण माझे त्यांचे बऱ्यापैकी संबंध आहेत. पण गेले अनेक वर्ष राष्ट्रवादीचे काम करताना आरोप प्रत्यारोप करणे याशिवाय त्यांना दुसरं काही काम नाही आणि याच नावावर त्यांचा सगळं राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे की, तुम्ही नीट या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा. एखाद्या परिवाराला टार्गेट करून तुमची राजकीय पोळी भाजू नका.

पोलीस या प्रकरणात सत्यता पडताळून पाहतील. त्या विषयाला अनेक कांगोरे आहेत. तुम्ही जर गावात चौकशी केली तर तुम्हाला ते समजतील, असा सल्ला कांबळे यांनी यावेळी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना दिला. पोलिसांवर दबाव आणण्याचे काम तुम्ही करू नये, आम्हीही आणत नाही. पोलिसांना आमची विनंती आहे की तुम्ही सत्तेच्या बाजूने जा. एखाद्या पक्षाचं काम वाढत असेल संघटना वाढत असेल तर दुसऱ्या पक्षाला पोटात दुखायचं काही काम नाही. हे भाजपाला बदनाम करण्याचं काम आहे किंवा ते कोणाच्या तरी सांगण्यावरून करत आहेत, असा माझा स्पष्ट आरोप आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com