अपवाद वगळता बंडखोरांचा पराभवच होईल ; शरद पवारांचा हल्लाबोल

'शिवसेनेचे आमदार सोडून गेलेले शिवसैनिकांना आवडलं नसून पुढच्या निवडणुकीत अपवाद वगळता सर्वांचा पराभव होईल,'
 Sharad Pawar News, Political News Today, NCP News, Rajkiya News
Sharad Pawar News, Political News Today, NCP News, Rajkiya Newssarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेच्या (shivsena) बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. 'शिवसेनेचे आमदार सोडून गेलेले शिवसैनिकांना आवडलं नसून पुढच्या निवडणुकीत अपवाद वगळता सर्वांचा पराभव होईल,' असे पवार म्हणाले. (Sharad Pawar latest Marathi news)

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा आपल्या मतदार संघात परत आले आहेत, काही आमदारांचे समर्थन करण्यात आले आहे, तर काही आमदारांना विरोधही करण्यात आला आहे. हे बंडखोर आमदार परत निवडून येणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण केलं आहे.(Political News Updates)

"शिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर या 40 आमदारांपैकी एकही जण निवडून येणार नाही," असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

शरद पवार म्हणाले,"सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगलं काम केल्याचं ठिकठिकाणी ऐकायला मिळतं. प्रदेशाध्यक्षांनी सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे,"

 Sharad Pawar News, Political News Today, NCP News, Rajkiya News
काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला राहुल गांधींची दांडी

"शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्र वेगळं असेल," असेही पवार म्हणाले. "सत्ता विकेंद्रीत झाली पाहिजे. मात्र आज केंद्रातील सरकार सबंध देशातील सत्ता केंद्रीत करत आहे. ही केंद्रीत झालेली सत्ता एक विशिष्ट विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. सत्तेचा गैरवापर करुन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप पवारांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com