Sharad Pawar Withdraw Resignation: शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचं 'हे' आहे खरं कारण!

Sharad Pawar Live Press Conference : "यापुढे पक्षवाढीसाठी यापेक्षा अधिक जोमाने काम करणार..."
Sharad Pawar Live Press Conference
Sharad Pawar Live Press ConferenceSarkarnama

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता.२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाला राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय मागे घेतला आहे.

त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदच वातावरण आहे. दोन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतला. वाय.बी.सेंटर सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपला हा निर्णय त्यांनी जाहीर केला.

यावेळी शरद पवार म्हणाले, "२ मे २०२३ रोजी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी भूमिका होती. मात्र, मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटल्या".

Sharad Pawar Live Press Conference
Sharad Pawar Live: शरद पवारांचा राजीनामा अखेर मागे; कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून घेतला निर्णय

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यानी संघटित होऊन एकमुखाने काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध पक्षाचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली.

"लोक माझे सांगाती' हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे.

माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या याचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे", असं ते यावेळी म्हणाले.

Sharad Pawar Live Press Conference
Lok Maze Sangati : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेत वादळ उठेल, याचा अंदाज नव्हता : शरद पवारांची कबुली

"मी पुन्हा अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे गरजेचे असते. त्यामुळे माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करण्यावर भर असेल. तसेच यापुढे पक्षवाढीसाठी पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी यापेक्षा अधिक जोमाने काम करील", असंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com