पवारांच्या दौऱ्याची सुरुवात शिंदेंच्या ठाण्यातून; भाजपवर सडकून टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar ठाणे : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे राज्याचा दौरा करत आहेत. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही राज्याचा दौरा करणार आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेही काही निवडक जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याची माहती त्यांनी दिली.

शरद पवार यांनी आज ठाण्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पवार म्हणाले, मी ठाण्यात बैठकीसाठी अलो होतो. माझा प्रयत्न असणार आहे की पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विदर्भाचा दौरा केला आहे. मीही काही निवडक जिल्ह्यात जाणार आहे. त्यांची सुरुवात मी आज ठाण्यातून केली आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

Sharad Pawar
पवारांनी यादीच वाचून दाखवली; शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून केंद्र सरकारवर निशाणा

दरम्यान, ठाण्यात पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारने कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच गुरजार तसकारने सोडलेल्या आरोपींवरुनही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ होत आहे.

गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला हे संपूर्ण देशाला माहित आहे. त्यामधे सेशन कोर्ट, उच्च न्यायालय, आणि सर्वोच्च न्यायालय यांनी कठोर शिक्षा दिली. आजन्म कारावास देण्यात आला होता. त्यानंतर ती जन्मठेपेत वर्ग केली. आता गुजरात सरकारने त्यांना सोडले आणि त्यांचा जाहीर सत्कार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 15 ऑगस्टच भाषण ऐकले, त्यामधे स्त्री वर्गाबाबत ते बोलले. मात्र, त्यांच्यांच राज्यांत महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आले, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Shiv sena : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार ; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले

कोणाच्या विरोधात ईडी, सीबीआय लावता येईल का याकडेच केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. विरोधी पक्षांची सत्ता पाडण्याचे काम सध्या सुरु आहेत. कर्नाटक, तसेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. अनेक राज्यामध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत. गुजरात, आसाम ही मोजकी राज्य सोडली, तर भाजपकडे राज्य नव्हती. माणसे फोडणे आणि सरकार स्थापन करणे, ईडीचा वापर करणे असे उद्योग सध्या सुरु आहेत, असा निशाणा भाजपवर पवार यांनी साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in