आरोपांना घाबरू नका; शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना केले आश्वस्त!

गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) येथे नवीन इमारत बांधण्यासाठीच्या कामाचा प्रारंभ आज मोठ्या दिमाखात करण्यात आला.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

मुंबई : मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्यांचा आज मोठा प्रश्न आहे. त्याचे निवारण करण्यासाठी धाडसाने निर्णय घेण्याची गरज आहे. टीका टिप्पणी होईल, पण स्वच्छ कारभार करण्याचा आपला निर्धार असल्यानंतर आरोपांची चिंता करायची गरज नाही, असे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) येथे नवीन इमारत बांधण्यासाठीच्या कामाचा प्रारंभ आज मोठ्या दिमाखात करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), हसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

Sharad Pawar
घर झाल्यावर आम्हाला चहाला बोलवा : चाळ रहिवाशांना मुख्यमंत्र्यांची भावनिक साद

यावेळी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, विकास करण्यासाठी धाडसाने निर्णय घ्यावे लागतात. टीका टिप्पणी होत असते. आरोपांची चिंता करून आपण निर्णय घेण्यासाठी थांबलो तर त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाच्या विकासावर होत असतात. मी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत आहे. अनेक प्रकारचे उपक्रम राज्यात आणि देशात राबवले. कधी काळी टीका, आरोप झाले. मात्र, त्याची फिकीर केली नाही, असेही ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड आणि महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात भाजपकडून आरोप केले जात आहेत. त्यावरच पवार यांनी आरोपांना घाबरू नका असे सांगत आव्हाडांना आश्वस्त केले.

माझ्यावरही अनेकांनी आरोप केले. मात्र, ते आरोप खरे नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारने हाती घेतलेला उपक्रम पूर्ण करावा. घरांच्या कामाला जास्तीत जास्त गती द्यावी. ज्याठिकाणी निर्णय घ्यायचा आहे, तिथे धाडसाने घ्यावा. मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी धडाडीने निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनता राज्य सरकारच्या पाठिशी उभी राहील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar
जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रपतींचे उदाहरण देत मांडले समाज वास्तव

या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. या वेळी बोलताना ठाकरे म्हणाले की पत्राचाळ हा विषय अनेकांना माहीत आहे. त्याचे दळण अनेक वर्षे दळल जात होते. पत्रा चाळीत काही महिन्यांपूर्वी संघर्ष समिती भेटायला आली होती. तेव्हा आम्ही त्यांना वचन दिले होते. हा विषय सोडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांना दिला होता. सगळ्या अडचणी दूर करून हा मुहूर्त आज साधला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com