Jayant Patil ED Enquiry : जयंत पाटलांना अडकवण्याचा प्रयत्न; 'ईडी' चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

Jayant Patil News : भाजप आणि 'ईडी'च्या विरोधात राज्यभरात आंदोलन
NCP Protest
NCP ProtestSarkarnama

ED inquiry of Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज (ता. २२) 'ईडी'कडून चौकशी होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहारप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, या चौकशीवरून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी कार्यकर्ते भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत आहेत.

जयंत पाटील यांना सोमवारी (ता. १५ मे) सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली होती. त्यानुसार पाटील आज (ता. २२ ) ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नागपूरसह (Maharashtra) इतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तांनी आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप कट-कारस्थान करून विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

NCP Protest
Jayant Patil ED Enquiry : मला माहित आहे कशासाठी चौकशी होतेय; जयंत पाटलांनी कारणच सांगितलं

पाटील यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मुंबई कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. तेथे त्यांनी ईडी आणि भाजापविरोधात ठिय्या आंदोलन छेडले आहे. तसेच जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करीत आहेत. जयंत पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरही लावले आहेत. भाजपने ही चौकशी मागे घ्यावी. आता आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. वेळ पडली तर रस्त्यावर उतरु, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

NCP Protest
Karjat Bazar Samiti : कर्जत बाजार समितीच्या दोन जागांची फेरमतमोजणी : रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. तसेच चौकशीचे कारण सांगितले. पाटील म्हणाले, "ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. मला जी माहिती असेल ती मी चौकशीदरम्यान 'ईडी'ला देणार आहरे. मला माहिती आहे का चौकशी होतेय ती. मात्र 'ईडी' ज्या कंपनीचे नाव घेतेय त्या आयएल अॅण्ड एफएस या कंपनीशी माझा जीवनात संबंध आलेला नाही. दरम्यान, मी या चौकशीकामी 'ईडी'ला पूर्णपणे सहकार्य करणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com