NCP : पवारांवर टीका करणाऱ्या सदावर्ते यांच्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

NCP : कोणी कितीही टीका केली, तरी ते त्यांच्या कामापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे हतबल होऊन टीकाकार टीका करत राहतात.
Mahesh Tapase
Mahesh Tapasesarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केलेल्या ११८ राज्य परिवहन महामंडळाच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. यावर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.सदावर्तेंनी क्रांतिवीरांना सेवेत घेतल्याची प्रतिक्रिया दिली होती. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यात आली. त्यांना कष्टकऱ्यांप्रती कळवळा आहे. त्यासाठी त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला म्हणून ११८ कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावरून उद्धव ठाकरे सरकारने त्यांना नोकरीवरून काढलं होतं.”

तपासे म्हणाले, "शरद पवार, अजित पवारांवर टीका करणे ही महाराष्ट्रातल्या काही लोकांची फॅशन झाली आहे. मात्र, त्यांच्या कामाची इतकी उंची आहे की, कोणी कितीही टीका केली, तरी ते त्यांच्या कामापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे हतबल होऊन टीकाकार टीका करत राहतात. तेवढेच काम काल त्यांनी केले आहे,"

Mahesh Tapase
PFI : पीएफआयच्या रडारवर मोदी, शहा, फडणवीस, ठाकरे.. ; पत्रातून धक्कादायक माहिती

"एवढ्या खालच्या पातळीवरची टीका करणे, फक्त गुणरत्नच करू शकतात. त्यांच्यामध्ये ना गुण आहेत, ना रत्न आहेत. ज्यांच्या मनात महाराष्ट्राच्या एवढ्या जेष्ठ नेत्याबद्दल अशी कटुता आहे, त्यांच्या मनात सामाजिक भाव काय असू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला कळालेले आहे," असे तपासे म्हणाले.

एसटीच्या (ST Employee) विलिनीकरण आणि पगारवाढीच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप जवळपास सहा महिने सुरु होता. मागण्या मान्य होत नसल्याने आक्रमक झालेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हरओक (SilverOak) या निवासस्थानी हल्ला चढवला होता. पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली होती. याप्रकरणी ११८ कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला करणाऱ्या या ११८ बडतर्फ कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संपकरी आंदोलकांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचं नाव घेतलं होतं. यानंतर सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com