Ncp News : स्वराज्यरक्षकच्या समर्थनासाठी राष्ट्रवादीची 'महापुरुष सन्मान जागर यात्रा'!

Ncp News : विविध जिल्ह्यात जाऊन गावपातळीवर या यात्रेत दोन्ही नेते लोकांचे प्रबोधन करणार!
Ncp News | Amol Mitkari Jitendra Awhad
Ncp News | Amol Mitkari Jitendra AwhadSarkarnama

मुंबई : राज्यात महापुरूषांबाबतच्या वक्तव्यांवरून वाद घडून आले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेत्यांकडूनही महापुरूषांबाबत वक्तव्ये करण्यात आली. संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक की धर्मवीर या वादावरही राज्याचं राजकीय वातावरण तापलेले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापुरूषांची गाथा सांगण्यासाठी संवाद जागरयात्रा काढण्यात येणार आहे.

महापुरुषांची महती, महापुरूषांची गाथा सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात महापुरूष संवाद जागरयात्रा काढण्यात येणार आहे. माजी गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व विधान परिषेदेवरील आमदार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे दोघेही या संवाद जागर यात्रेची धुरा सांभाळणार आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यात जाऊन गावपातळीवर या यात्रेत दोन्ही नेते लोकांचे प्रबोधन करतील.

Ncp News | Amol Mitkari Jitendra Awhad
Gopichand Padalkar : पवारांच्या नादाला लागून ठाकरेंनी नुकसान करुन घेतलं..

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षक की धर्मवीर ' असा वाद निर्माण झाला होता. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात, 'छत्रपती संभाजीमहाराज धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, ' असे वक्तव्य केले होते. यावरून राष्ट्रवादी आणि अजित पवारांना भाजपच्या नेत्यांनी लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर आता महापुरुष सन्मान जागर यात्रा काढण्यात येणार आहे. यांचे नेतृत्व जितेंद्र आव्हाड व अमोल मिटकारी करणार आहेत.

Ncp News | Amol Mitkari Jitendra Awhad
ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी संपता-संपेनात, दहा तारीख आली; वेतनाचं काय होणार?

जितेंद्र आव्हाड व अमोल मिटकरी महाराष्ट्रभर दौरे करून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्री बाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ते स्वातंत्र्य संग्रामामधील अग्रणी नेते यांच्या गाथा ते लोकांपर्य़ंत नेणार आहेत. याचे राज्यभर मेळावे होतील. यामध्ये पुरोगामी विचाराचे पक्ष,व्यक्ती ,संस्था यांना आमंत्रित करण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in