Ncp News : भाजप आमदाराचे 'लाड' पुरवले, राष्ट्रवादीकडून भ्रष्टाचाराचे आरोप!

Prasad lad : "लाडांनी एवढेच म्हंटले पाहिजे की, 'होय मी लाभार्थी'.."
Prasad Lad | Suraj Chavhan
Prasad Lad | Suraj ChavhanSarkarnama

Mumbai News : विधान परिषेदेवर आमदार म्हणून निवडून गेलेले भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.यामुळे आता आणखी एका प्रकरणावरून राष्ट्रवादी भाजपला घेरणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लाड यांच्यावर आरोप केले गेले आहेत. यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना होण्याची शक्यता आहे.

Prasad Lad | Suraj Chavhan
CM Eknath Shinde : विरोधी नेत्यांनो नीट राहा; कारण मुख्यमंत्री शिंदेंनी मागवलेत तीन जाडजूड बांबू !

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आमदार प्रसाद लाड आणि भाजपवर आरोप केले आहेत. आपल्या आमदारवर भाजपने मेहरनजर करून 'लाड' पुरवल्याचा आरोप त्यांनी आरोप केला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी लाड यांच्यावर निशाणा साधलेला आहे. 'आमदार लाड यांनी आता एकच बोलले पाहिजे, होय मी लाभार्थी आणि हे माझं सरकार ,' असं म्हणत त्यांनी लाड यांना लक्ष्य केले आहे.

सूरज चव्हाण ट्विट करत म्हणतात, "खासगी तत्वावर कर्मचारी भरण्यासाठी नेमण्यात आलेल्या नऊ एजन्सीमधील “क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड” ही कंपनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची असून या कंपनीला हे कंत्राट दिले आहे.आ.प्रसाद लाड यांनी आता एकच बोललं पाहिजे. होय मी लाभार्थी हे माझं सरकार."

Prasad Lad | Suraj Chavhan
Lokayukta Bill : लोकायुक्त कायदा आज विधान परिषेदेच्या पटलावर ; मंजूर होणार की...

या आरोपावर आमदार लाड यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राज्याचं सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधक हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून घमासान होण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर लाड हे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com