NCP New Chief : मोठी बातमी : शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला ; कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न ; अध्यक्षपदी..

Rashtrawadi New President news : प्रफुल्ल पटेल यांनी या प्रस्ताव मांडला आहे.
Ncp Chief Sharad Pawar News
Ncp Chief Sharad Pawar NewsSarkarnama

Rashtrawadi New President news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे, पण त्यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारांनीच पदावर कायम राहावं, असा ठराव समितीने मांडला आहे. हा ठराव समितीने एकमतानं मंजूर केला आहे.

समितीचा हा निर्णय पवारांना सांगण्यात येणार आहे. पवार हे आता आपल्या घराकडून कार्यालयाकडे निघाले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी या प्रस्ताव मांडला होता.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सध्या बैठक सुरु आहे. सोळा सदस्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु आहे. कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या नावानं घोषणा देत आहे. एका कार्यकर्त्याचा यावेळी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Ncp Chief Sharad Pawar News
NCP New Chief : अध्यक्षपदासाठी पवारांनी नकार दिला तर..; समितीचे हे आहेत दोन प्लॅन

शरद पवार यांनी मंगळवारी पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे.

पवारांनी अध्यक्षपदी कायम होण्यास नकार दिल्यास सुप्रिया सुळे या अध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे. सुळेंच्या नावाशिवाय कुठल्याही नावाची चर्चा सध्या नाही. मात्र, पवार यांची धक्कातंत्राची शैली पाहता ते नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता कायम आहे.

Ncp Chief Sharad Pawar News
Maharashtra politics : मुख्यमंत्री होणे हेच अजितदादांचे अंतिम ध्येय ; सुळेंना नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी..

काल (गुरुवारी) पवारांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला असला तरीही ते अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत. ‘लोक माझ्या सांगाती’ या राजकीय आत्मवृत्ताच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षापदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून सर्वांची मनधरणी सुरू आहे. पवारांनी त्यांच्या निर्णयापासून परावृत्त व्हावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या केंद्राबाहेर बसले आहेत. पवारांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com