Nawab Malik News : मलिकांना दिलासा नाहीच ! ; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला..

Money laundering case Nawab Malik : सध्या नवाब मलिक यांच्यावर मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Nawab Malik News Updates
Nawab Malik News Updatessarkarnama

Money laundering case : मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. (NCP leader and Maharashtra former minister Nawab Malik)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईच्या विशेष न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांची मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या नवाब मलिक यांच्यावर मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकताच जामीन मिळाला आहे, त्यानंतर मलिक यांना जामीन मिळेल की नाही, याकडे लक्ष होते. पणे मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Nawab Malik News Updates
Delhi Mayor Election : महापौर निवडणुकीपूर्वी राडा ; आप-भाजपचे नगरसेवक भिडले,खुर्च्या फेकल्या..

मलिक गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत आणि ते मे महिन्यापासून एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मलिक आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. त्यांच्या वैद्यकीय अहवालात त्यांची डावी किडनी व्यवस्थित काम करत असल्याचे नमूद करण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी निवेदनातून निर्दशनास आणून दिले होते.

Nawab Malik News Updates
Lokayukta Bill : शिंदे-फडणवीसांना अपयश : 'लोकायुक्त' रखडल्याचे 'हे' आहे कारण..

काय आहे प्रकरण ...

मनी लॉण्ड्रींग प्रकरणी (Money Laundering) अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. मंत्री नवाब मलिक यांनी जी जमीन घेतली आहे. ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सरदार पटेल जो हसीना पारकरचा राईट हँड आहे. आणि ज्याला हसीना पारकर (Haseena Parkar) दाऊदच्या प्रॉपर्टी बिझमेसमध्ये फ्रंट मॅन वापरत होती. त्यांच्याकडून ही जमीन त्यांनी घेतली, असा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.

हसीना पारकर, सरदार खान आणि नवाब यांनी गोवावाल कंपाऊंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला इथले प्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com