वानखेडे हे परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्याच कॅटेगरीतील अधिकारी

नबाब मलिक (nawab malik)आणि एनसीबी यांचा सामना रंगला आहे. नबाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

वानखेडे हे परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्याच कॅटेगरीतील अधिकारी
sameer wankhede,nawab maliksarkarnama

मुंबई: अभिनेता शाहरुखखान यांचा मुलगा आर्यनला एनसीबीने अटक केल्यानंतर रोज नवी माहिती समोर येत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नबाब मलिक (nawab malik)आणि एनसीबी यांचा सामना रंगला आहे. नबाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'समीर वानखेडे हे परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्याच कॅटेगरीतील अधिकारी आहेत,' असा आरोप मलिक (nawab malik) यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बनावट असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. ''जेव्हा ड्रग्स प्रकरणात छापेमारी होते तेव्हा जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा केला जातो. हा सगळा जप्तीचा माल कोणासमोरही उघडता येत नाही. फक्त कोर्टात मॅजिस्ट्रेटच्या समोर ते उघडलं जातं आणि लगेच सील केलं जातं. पण ज्या पद्धतीने ड्रग्स असल्याचा दावा करणारे फोटो हे मीडियामध्ये देण्यात आले त्या व्हीडिओ आणि फोटो यातून हेच दिसतं की, या वस्तू क्रूझवर सापडलेल्या नाही. कारण त्या झोनल ऑफिसमध्येच दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे.' असा आरोप मलिकांनी केला होता.

sameer wankhede,nawab malik
अजितदादा म्हणाले, ''पाहुण्यांचे काम सुरु आहे, ते गेल्यावर बोलेन, 'ढगात गोळ्या मारु नका'

मलिक यांचे आरोप फेटाळताना वानखेडे यांनी आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं म्हटलं होतं. त्यावर मलिक यांनी आज जोरदार पलटवार केला. मलिक म्हणाले, ''परमबीर सिंग देखील जनतेचा सेवक होता. प्रदीप शर्मा हे सुद्धा जनतेचे सेवक होते. परंतु देशसेवा न करता ते दुसरेच धंदे करत होते. हा व्यक्ती देखील त्यातील आहे. हळूहळू या सगळ्याचा खुलासा करणार आहे,

परमबीर सिंग, वाझे देखील जनतेचे सेवकच होते. शर्मापण जनतेचे सेवक होते. परंतु ते देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्ती देखील त्यातील आहे.''

'कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅम ड्रग्सप्रकरणी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये 20 किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामे आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात येतील तसतशी यांची पोलखोल करणार.' असा इशारा नवाब मलिक दिला आहे.

Related Stories

No stories found.