राष्ट्रवादीची रणनिती ठरली; आमदारांना सकाळी उपमुख्यमंत्री कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांची बैठक मुंबईमध्ये झाली.
राष्ट्रवादीची रणनिती ठरली; आमदारांना सकाळी उपमुख्यमंत्री कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश
ncpsarkarnama

मुंबई : राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) उद्या (ता.१०) मतदान होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी राजकीय समीकरणांना वेग आला आहे. भाजपने (BJP) आपला तिसरा उमेदवार आणि शिवसेनेने (Shivsena) दुसरा उमेदवार निवडून आण्यासाठी जोर लावला आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांची बैठक मुंबईमध्ये झाली. त्या बैठकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

यावेळी आमदारांची नाराजी दुर केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. आमदारांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सोडवल्या जातील. अपक्ष आमदार असो किंवा पक्षातील आमदार. मंत्र्यांच्या बाबत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. आता मतदान महत्वाचे, नियमानुसार मतदान करावे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात बैठक झाली.

ncp
लक्ष्मण जगताप म्हणाले, मला पक्षादेश पाळाचायं : कुटुंबियांकडून मुंबईला नेण्याची तयारी सुरु

तसेच उद्या शुक्रवारी सर्व आमदारांना उपमुख्यमंत्री कार्यालयात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर कशा क्रमाने मतदान करायचे? कोणाला मतदान करायचे याची सूचना मिळणार आहे. अती उत्साह दाखवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखा प्रकार करु नका, असेही आमदारांना सांगण्यात आले आहे. गुजरातच्या निवडणुकीसारखी मतपत्रिका बाद होऊ देवू नका, अशा सूचना पवार यांनी केल्या. आमदारांना सकाळी प्राध्यान्यक्रमाबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.

ncp
राजकीय समीकरणांना वेग! पवार, ठाकरे अन् फडणवीसांनी हाती घेतली सूत्रे

दरम्यान, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षाच्या बैठकीला हजेरी लावत त्यांनी निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. कोणाताही दगाफटका होऊ नये यासाठी राज्यातील सर्वोच्च नेते स्वत: मैदानात उतरल्यामुळे राजकारण चांगलेच ठवळून निघाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in